Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

Wife and Lover Booked for Killing Husband: एका महिलेनं तिच्या प्रियकरासह तिच्या पतीचा तलवारीने गळा चिरून हत्या केली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.
Crime
CrimeSaam
Published On

पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गोपाळगंजमधून समोर येत आहे. एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तसेच त्यांनी हत्येत वापरलेली तलवारही जप्त केली आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

ध्रुव प्रसाद (वय वर्ष ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, किरण देवी (वय वर्ष २५) आणि विकास कुमार असे आरोपींचे नाव आहे. हे तिघेही गोपाळगंज येथील बरौली पोलीस स्टेशन हद्दीतील कटहरीबारी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव प्रसाद काही दिवसांपूर्वीच पंजाबमधून घरी परतला होता.

शनिवारी रात्री ११ वाजता, ध्रुव प्रसादने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत पाहिले. या घटनेनंतर त्याने पत्नीला मारहाण केली. या वादानंतर, किरण देवी आणि विकास कुमार यांनी मिळून ध्रुव प्रसादची हत्या करण्याचा कट रचला.

Crime
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला, धक्कादायक माहिती उघड; विचारही केला नसेल इतकं भयंकर

रात्री ध्रुव झोपलेला असताना दोघांनी त्याच्या मानेवर तलवारीने वार करून त्याचा जागीच खून केला. किरण देवीचे विकास कुमारसोबत तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. पतीला या संबंधांची माहिती झाल्यानंतर, त्यांच्यात सतत वाद होत होते. या वादातूनच त्यांनी ध्रुव प्रसादची हत्या केली. पोलिसांनी किरण देवीला अटक केली असून, विकास कुमारला सिवान जिल्ह्यातील नबीगंज येथून अटक करण्यात आली.

Crime
Highway Video: हायवेवरच शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्यासह त्या महिलेचे आणखी २ व्हिडिओ व्हायरल; रस्त्यावरच नग्नावस्थेत नाचत होते...

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठवले असून, पोलीस निरीक्षक हरेंद्र कुमार आणि पोलीस अधिकारी दीपक कुमार पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर आरोपींविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com