
मध्यप्रदेशमधील राजकीय नेत्याचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरवर शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मनोहरलाल धाकड याला अटक केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मनोहरलाल धाकड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत धाकड याच्यासोबत असलेली महिला नग्न अवस्थेतच रस्त्यावर फिरत आहेत. तसेच दोघेही नाचत होते. सध्या धाकड याचा दुसरा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
मध्यप्रदेशातील मंदसौरमधील मनोहरलाल धाकड हे महासभेचे राष्ट्रीय नेते होते. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. अटकेनंतर धाकड याचा आणखी एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एक्सप्रेस वेवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात २ व्हिडिओ रेकॉर्ड झाले. पहिल्या व्हिडिओत मनोहरलाल याची कार ८ लेनवर थांबते. नंतर त्यातून आधी महिला नग्न अवस्थेत बाहेर निघते. नंतर मनोहरलाल धाकड अर्धनग्न अवस्थेत बाहेर येतो.
दोघेही रस्त्यावर शरीरसंबंध ठेवतात. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसरा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. शरीरसंबंध ठेवल्यानंतर दोघेही कारमध्ये शिरतात. मात्र, पुन्हा काही वेळानंतर बाहेर येतात. नंतर महामार्गावर चालतात. महिला ही नग्न अवस्थेतच चालत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दोघेही रस्त्यावर काही अंतर चालतात आणि नंतर हात धरून नाचतात.
यानंतर पुन्हा येऊन कारमध्ये बसतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी २३ मे रोजी मनोहरलाल धाकडविरोधात भानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी धाकड याच्या घरावर छापा टाकत कार जप्त केली. दरम्यान, पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धाकडचे कृत्य सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाल्यानंतर नियंत्रण कक्षात असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यांनी धाकडला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी धाकडकडून २०,००० रूपये वसूल केले होते. त्यांनी आणखी पैशांनी मागणी केली. मात्र, धाकडने पैसे देण्यास नकार दिला. धाकड पैसे देत नसल्याचे कळताच त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. पोलीस व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचाही शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.