Beed : बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू

Massive Road Accident in Beed’s Gevrai : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाड झालेली गाडी उचलायला गेलेल्या सहा जणांना भरधाव कंटेनरने उडवलं. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
accident
accidentSaam TV News
Published On

राज्यात २६ मे रोजी पावसाचा धुमाकूळ सुरू असताना बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा बीडमधील गेवराई येथे अतिशय भयंकर अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला... जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली.

accident
Beed News : पप्पा बोलले कांदे विकल्यावर चप्पल घेऊ, तुझी फिस भरु; पावसात कांदे वाहून गेल्याने चिमुकलीच्या डोळ्यात पाणी

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

accident
Beed Rain: बीडला पावसाचा तडाखा; दुरुस्त केलेला पूल एक तासातच गेला वाहून, कंत्राटदाराची पोलखोल|VIDEO

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही नागरिकांची चारचाकी गाडी तांत्रिक बिघाडामुळे गढी परिसरात बंद पडली होती. या गाडीला आणण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्त होतं.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघाताने गेवराई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com