Beed Unseasonal Rain
Beed Unseasonal RainSaam tv

Beed News : पप्पा बोलले कांदे विकल्यावर चप्पल घेऊ, तुझी फिस भरु; पावसात कांदे वाहून गेल्याने चिमुकलीच्या डोळ्यात पाणी

Beed Unseasonal Rain : बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये गेली पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती. कांदा शेतात काढून ठेवला. मार्केटमध्ये घेउन जायचा होता
Published on

योगेश काशीद 

बीड : अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसानीची झळ शेतकऱ्याला सहन करावी लागत आहे. यात अवकाळीमुळे काढणी केलेल्या कांदा वाहून गेल्याचे चित्र आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथे पाहण्यास मिळत आहे. यामुळे संपूर्ण कांदा पाण्यात गेल्याने शेतकरी कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते. 

बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये गेली पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती. कांदा शेतात काढून ठेवला. मार्केटमध्ये घेउन जायचा होता, पण गेली सहा दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास ३०० गोणी कांदा अक्षरशः शेतात अवकाळी पावसामूळे वाहून गेला आहे. या कांद्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.

Beed Unseasonal Rain
Sambhajinagar Accident : दोन ट्रकचा भीषण अपघात; एकाच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

चिखलात माखलेला कांदा करावा लागतोय गोळा 

दरम्यान भर पावसात दरेकर शेतकरी कुटूंबाला पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला आणि चिखलात भिजलेला कांदा गोळा करण्याची वेळ आली आहे. यात सहा वर्षाची चिमुकली देखील कांदा गोळा करत आहे. या चिमुकली प्रगतीला वाटतंय की कांदा विकल्यावर माझे पप्पा मला चप्पल घेतील. शाळेची फिस भरतील, पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे ऐण्याऐवजी फक्त कांद्याचा चिखलच हाती येत आहे.

Beed Unseasonal Rain
Chandan Uti Puja : विठ्ठल रुक्मिणी चंदन उटी पूजेतून मिळाले १४ लाखांचे उत्पन्न; पूजेसाठी ५३ किलो चंदनाचा झाला वापर

आता शाळेत कशी जाणार 

चिमुकली प्रगती म्हणते की मी आता शाळेत कशी जाणार, पप्पा माझी फिस कशी भरणार तुम्हीच मदत करा साहेब. अशी भावनिक साद प्रगती घालते. हे सांगताना या चिमुकलीच्या डोळ्यात देखील पाणी आले होते. दरम्यान पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत. मुजूरांचे पैसे देणे बाकी आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने खत बी- बियाणे कुठून आणायचे. मुलांची फिस कशी भरायची; अशी प्रतिक्रिया चिमुकल्या प्रगतीची आई सोनाली दरेकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com