छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावर विट वाहतुक करणारा मिनी ट्रक व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली होती.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील ढोरकीन शिवारातील टाकळी फाट्यानजीक हॉटेल साईलिला समोर आज (२५ मे) पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान विट वाहतुक करणारा मिनी ट्रक व मालवाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात समीर नवाब शहा (वय.२२, रा.चित्ते पिंपळगाव, ता. छ. संभाजीनगर) असे मृत झालेल्याचे नाव आहे. तर एका गंभीर जखमीचे नाव कळु शकले नाही.
जेसीबीच्या साहाय्याने मृताला काढले बाहेर
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राहुल मोहतमल, पोलिस अंमलदार सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने अपघातातील वाहने बाजुला करुन मयत समीर शहा व गंभीर जखमी यांना तब्बल ३० मिनिटे अथक परिश्रम घेत वाहनाच्या बाहेर काढण्यात यश आले.
बराच वेळ खोळंबली वाहतूक
दरम्यान घटनास्थळावरुन मयत झालेल्या चालकास खासगी रूग्णवाहिकेतुन तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मयत घोषित केले आहे. दरम्यान अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.