Hagawane Family
Hagawane Family x

Hagawane Family : हगवणे कुटुंबाचे पाय खोलात, थोरल्या सुनेच्या आरोपांची चौकशी होणार

Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबाचे पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोरल्या सुनेने म्हणजेच मयुरी हगवणेने केलेल्या आरोपांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे हगवणे कुटुंबाचा चेहरा सर्वांसमोर आला. हगवणे कुटुंबाने फक्त वैष्णवीच नाही, तर त्यांच्या थोरल्या सुनेचा मयुरी हगवणेचा छळ केला होता. तिने या प्रकरण पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील केली होती. वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीने हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते.

सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून मयुरी हगवणे तिच्या माहेरी राहायला गेली. सासरकडच्या छळाबद्दल तिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी अहवाल सादर करत पोलीस तपासाची माहिती दिली आहे.

Hagawane Family
वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची, चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिल्याने आत्महत्या केली असावी; हगवणेंच्या वकिलांचा खळबळजनक दावा

आवश्यक पोलिस तपासानंतर महिला अत्याचारासंबंधीच्या या प्रकरणी गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना दोषारोपपत्र विहित मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब अहवालात निदर्शनास आली आहे. दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

Hagawane Family
Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

आज (२८ मे) वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबियांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. हगवणेंच्या वकिलाने युक्तिवाद केला. न्यायालयाने वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद यांना एका दिवसाची, तर वैष्णवीचा सासरा आणि दीर यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान हगवणेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला मिळत आहे.

Hagawane Family
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com