Gokul Chairman : 'गोकूळ'वर महायुतीची सत्ता, नाविद मुश्रीफ नवे अध्यक्ष; गोकूळच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात

Gokul Dudh Sangh Chairman : कोल्हापूरच्या गोकूळमध्ये चक्कं काँग्रेसनं महायुतीला मदत केलीय. चेअरमन पदासाठी सजेत पाटील महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आणि मुश्रीफांनी बाजी मारलीय.
Gokul Dudh Sangh Chairman
Gokul Dudh Sangh Chairman Saam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकूळमध्ये चक्कं काँग्रेसनं महायुतीला मदत केलीय. चेअरमन पदासाठी सजेत पाटील महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आणि मुश्रीफांनी बाजी मारलीय. मात्र गोकूळ राजकीय नेत्यांसाठी एवढं महत्वाचं का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

महिनाभराच्या राजकीय हाय होल्टेज ड्राम्यानंतर अखेर गोकूळ दुधसंघाच्या चेअरमनपदाची माळ काँग्रेसच्या मदतीनं हसन मुश्रीफांचा मुलगा नवीद मुश्रीफांच्या गळ्यात पडली, आणि गोकूळवर महायुतीचा झेंडा फडकला. त्यामुळे महिनाभराच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडलाय.

Gokul Dudh Sangh Chairman
Corona Update : आषाढी वारीवर कोरोनाचं संकट, सोलापुरात २ रुग्णांची नोंद; प्रशासनाचं नियोजन काय?

आमदारकी नको पण गोकूळचं अध्यक्षपद हवं, अशी कोल्हापूरच्या नेत्यांची भावना आहे. त्याचं कारण गोकूळला कोल्हापूरचं आर्थिक सत्ता केंद्र मानलं जातं. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोकूळच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी रणनीती आखली, आणि प्रचंड गुप्तपणे नवीद मुश्रीफांचं नाव जाहीर केलं. त्यासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटलांनी लखोटा देऊन नव्या अध्यक्षांची निवड केली.

खरंतर कोल्हापूरमध्ये गोकूळचे २० हजार सभासद आणि २३ संचालक आहेत. तर गोकूळवर हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि प्रकाश आबिटकरांच्या शाहू आघाडीची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर गोकूळमध्ये चेअरमन बदलाच्या हालचाली सुरु झाल्या. त्यामुळे भाजपकडून संजय घाटगेंचा मुलगा अंबरिश घाटगे आणि शशिकांत पाटील यांची नावं चर्चेत होते. मात्र अचानक चक्रं फिरले आणि सतेज पाटलांनीही महायुतीच्या नवीद मुश्रीफांना पाठींबा देत बाजी पलटवली.

Gokul Dudh Sangh Chairman
Worli Property Deal : घरविक्रीचा सर्वात महागडा व्यवहार; 700 कोटीचं घर कुणी घेतलं? VIDEO

कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. याच संस्थात्मक राजकारणाच्या जीवावर हसन मुश्रीफ कागलमधून बाजी मारत आहेत. मात्र आता कोल्हापूर जिल्हा बँक आणि त्यानंतर गोकूळच्याही चाव्या मुश्रीफांच्या घरात राहणार आणि पर्यायाने मुश्रीफांचं कोल्हापूरच्या राजकारणात वजन वाढणार हे निश्चित...

Gokul Dudh Sangh Chairman
Manikrao Kokate : कृषीमंत्री म्हणतात, ढेकळाचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा बरळले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com