Bathwater: प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच अंघोळीचे पाणी विकले; कंपनीने ठोठावला ९०,००० डॉलरचा दंड

Belle delphine Fined For Selling Bathwater: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही. एका व्यक्तीने तर चक्क आपल्या अंघोळीचे पाणी लोकांना विकले आहे. बेले डेल्फीन असे या मुलीचे नाव आहे.
Belle delphine Fined For Selling Bathwater
Belle delphine Fined For Selling BathwaterSaam Tv

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही. एका व्यक्तीने तर चक्क आपल्या अंघोळीचे पाणी लोकांना विकले आहे. बेले डेल्फीन असे या मुलीचे नाव आहे.बेले डेल्फीन ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर आहे. तिने प्रसिद्धीसाठी आपण अंघोळ केलेले पाणी लोकांना विकले होते. मात्र, हे पाणी विकणे तिला महागात पडले आहे. तिने लोकांना अंघोळ केलेले पाणी विकल्यामुळे तिला दंड ठोठावण्यात आला आहे. पेपल या इंटरनेट बँकिंग अॅपने तिला दंड ठोठावला आहे. यासाठी तब्बल ९०,००० डॉलरपेक्षा जास्त पैसे तिला भरावे लागले आहे.

बेले डेल्फीन हीचे लाइव्हस्ट्रीमर म्हणून सोशल मीडियावर प्रचंड फॉलोवर्स आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अंघोळ केलेले पाणी विकले. तिने ३० डॉलर रुपयांना प्रति बॉटल बाथवॉटर विकले. यानंतर ती खूप सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आली होती. परंतु प्रसिद्धीसाठी केलेल्या या एका स्टंटमुळे तिला चांगलाच दंड भरावा लागला आहे. पेपल या इंटरनेट बँकिंगने तिला जवळपास ९०,००० डॉलरपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे.

Belle delphine Fined For Selling Bathwater
Haryana Politics : हरियाणात राजकीय भूकंप; भाजप सरकार अल्पमतात असल्याचा काँग्रेसचा दावा, राष्ट्रपती राजवट लागणार का?

याबाबत बेले डेल्फीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. बेले डेल्फिनने म्हटले आहे की, 'मी माझ्या अंघोळीचे पाणी विकून पैसे कमावले नाही तर गमावले आहे. PayPal या अॅपने कोणत्याही सूचनेशिवाय माझे खाते बंद केले आहे. तसेच माझ्या खात्यातून ९०,००० डॉलर रुपये काढून घेतले. मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच फायदा झाला'. बेले डेल्फीनने २०१९ मध्ये प्रसिद्धीझोतात येण्यासाठी आपल्याच अंघोळीचे पाणी विकले. परंतु २ वर्षांनी तिच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आहे.

Belle delphine Fined For Selling Bathwater
Air India News: 25 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं! सामूहिक सीक लीव्ह घेतल्यानं Air India एक्स्प्रेसची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com