Haryana Politics : हरियाणात राजकीय भूकंप; भाजप सरकार अल्पमतात असल्याचा काँग्रेसचा दावा, राष्ट्रपती राजवट लागणार का?

Congress Demand Impose President Rule: हरियाणामधील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. भाजप सरकार अल्पमतात आल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कॉंग्रेस करत आहेत.
हरियाणात राजकीय भूकंप
हरियाणात राजकीय भूकंपYandex

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

हरियाणामधील राजकीय (Haryana Politics) घडामोडी वाढल्या आहेत. भाजप सरकार अल्पमतात आल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कॉंग्रेस करत आहेत. हरियाणा काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहीत मागणी राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी केली आहे. हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

तीन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील नायबसिंह सैनी सरकार (BJP Government) अल्पमतात आलंय, असा उल्लेख पत्रात कॉंग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने सरकार बनवण्याचा निर्णय घ्यावा. त्यांनी जर सरकार बनवण्याचा दावा केला, तर आम्ही पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया १० आमदार असलेल्या JJP पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हरियाणामध्ये तीन अपक्ष आमदारांना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा काढून (Congress Demand President Rule) घेतला आहे. या आमदारांनी मंगळवारी सांगितलं की, आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. त्यांनी कॉंग्रसला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. सोंबीर सांगवान, रणधीर गोलेन आणि धरमपाल गोंडर, अशी या अपक्ष आमदारांची नावं आहेत. त्यांनी नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

हरियाणात राजकीय भूकंप
Haryana CM: हरियाणाआधी या राज्यांमध्येही भाजपने बदलले होते मुख्यमंत्री, निवडणुकीत काय झाला होता फायदा?

या आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे हरियाणामध्ये भाजप सरकार अल्पमतात आल्याचं कॉंग्रसेचं म्हणणं आहे. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहित राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागु करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. तर JJP पक्षाने कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

हरियाणात राजकीय भूकंप
Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com