Haryana CM: हरियाणाआधी या राज्यांमध्येही भाजपने बदलले होते मुख्यमंत्री, निवडणुकीत काय झाला होता फायदा?

BJP News: हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री बदलला आहे. मात्र असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही पक्षाने निवडणुकीआधी अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलून नवीन नेत्यांना संधी दिली आहे.
Manoharlal Khattar And Vijay Rupani
Manoharlal Khattar And Vijay RupaniSaam Tv
Published On

National Politics News In Marathi:

भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी दुपारी हरियाणाला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. पक्षाने नायबसिंह सैनी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे. ते आज संध्याकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री बदलला आहे. मात्र असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही पक्षाने निवडणुकीआधी अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलून नवीन नेत्यांना संधी दिली आहे. हरियाणाआधी भाजपने गुजरात आणि उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री बदलले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षाला फायदा झाला होता आणि दोन्ही राज्यात पुन्हा भाजपची सरकार सत्तेत आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoharlal Khattar And Vijay Rupani
Rahul Gandhi In Nandurbar : शेतकरी आणि आदिवासी समाजासाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; आमचं सरकार आलं तर...

हरियाणाप्रमाणे गुजरातमध्येही बदलण्यात आले होते मुख्यमंत्री

गुजरातमध्ये वर्ष 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं होतं. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि त्यानंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता. विजय रुपाणी यांना पदावरून हटवण्यामागे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नव्हते. मात्र कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत गुजरातमधून ज्या प्रकारे लोकांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या, त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविरुद्ध नाराजी असल्याची शक्यता वर्तवली जात होती.  (Latest Marathi News)

भाजप सरकार आणि विजय रुपाणी यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. याशिवाय गुजरातमधील भाजपचे अनेक आमदारही खूश नव्हते. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी केल्याचा दावाही सूत्रांनी केला होता. अशातच 2021 च्या निवडणुकीच्या काही महिने आधी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले.

Manoharlal Khattar And Vijay Rupani
Vasant More PC : अश्रू... आरोप... खदखद... संताप... वसंत मोरे यांची काळाजाला भिडणारी १० वाक्ये

उत्तराखंडमध्येही निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलण्यात आला

गुजरातशिवाय उत्तराखंडमध्येही भाजपने निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलला होता. जुलै 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. ते फक्त चार महिने या पदावर राहू शकले. पुढील वर्षी 2022 मध्ये उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. ज्यामध्ये पक्षाने 47 जागा जिंकून पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com