Vasant More PC : अश्रू... आरोप... खदखद... संताप... वसंत मोरे यांची काळाजाला भिडणारी १० वाक्ये

Vasant More PC after Left MNS : मनसेतून बाहेर पडताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले. मात्र यावेळी त्यांनी पक्षात होत असलेली घुसमट बोलून दाखवली.
Vasant More
Vasant More Saam TV
Published On

Pune Political News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना राज ठाकरे यांची साथ सोडली आहे. वसंत मोरे यांनी १७ वर्षांची मनसेतील प्रवास आज थांबवला. वसंत मोरे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याचं बोललं जात होते. अनेकदा तसे संकेत देखील त्यांनी दिले होते. मात्र अखेर वसंत मोरे यांनी आज निर्णय घेत पक्षातून बाहेर पडले आहे.

मनसेतून बाहेर पडताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले. मात्र यावेळी त्यांनी पक्षात होत असलेली घुसमट बोलून दाखवली. आपल्या अन्याय होत असल्याचं देखील त्यांनी आज बोलून दाखवलं. वसंत मोरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुणे मनसेतील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasant More
Vasant More Cried: ठाकरेंची साथ सोडताना वसंत तात्यांच्या डोळ्यात अश्रू, पत्रकार परिषदेत ढसढसा रडले; राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

वसंत मोरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • पुण्यातील मनसे नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला. मला डावलंल जात होतं. अखेर माझा कडेलोट झाला. पुणे मनसेमध्ये वातावरण चांगलं असताना देखील इथले पदाधिकारी निगेटिव्ह आहेत.

  • मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मी इच्छा व्यक्त करताच मनसेतील पुण्यातील इच्छुकांची यादी वाढत गेली.

  • मनसे लोकसभा निवडणूक लढवू शकत नाही, असा चुकीचा अहवाल राज साहेबांना देण्यात आला.

  • पक्षातील काही लोकांनी माझ्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले. काही लोकांनी मी निवडणूक लढू नये यासाठी प्रयत्न सुरु केले. (Latest Marathi News)

  • निवडणूक लढवणे हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना वाढवणे चुकीचं आहे का? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला.

  • माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही किंवा मनसेसोबतही नाही. मात्र पुणे शहर मनसेच्या चुकीच्या लोकांच्या हाती दिलं आहे. माझं राज ठाकरे यांच्या मनातील नाव हटवण्याचं काम कोअर कमिटीने केलं.

  • आता मी मनसेतून निवडणूक लढण्यास इच्छूक नाही. आता जे आहे त्या इच्छूकांनी उमेदवारी यादी द्यावी.

Vasant More
Vasant More Resign Reason: आधी राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत, नंतर फेसबुक पोस्ट; वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडण्याचं कारण
  • मनसेमध्ये पुन्हा येणार नाही. मी परतीचे सर्व दोर कापले आहेत. अशा लोकांसोबत काम करायचं नाही. मनसे संपवण्याचं काम ज्यांनी केलं त्याबाबत राज साहेब आणि अमित साहेबांना अनेकदा सांगितलं.

  • अद्याप मी कोणत्याही पक्षात गेलेलो नाही. पुणेकरांच्या म्हणण्यानुसार पुढील निर्णय घेईन. लोकांची इच्छा असेल तर मी एकटा निवडणूक लढेन.

  • मला ऑफर्स खूप आहेत, कुठे जाणार हे भविष्यात कळेल येणाऱ्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com