
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणाने मागील दोन वर्षांपासून लेकीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईसोबत आजोळी गेलेल्या पीडित मुलीने रडत रडत आजीला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला. पुढे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या छिंदवाडा देहात पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ९ वर्षांची लहान मुलगी तिच्या आईसोबत आजीच्या घरी आली होती. काही दिवस राहिल्यानंतर तिचे वडील घ्यायला आले. त्यावेळी ९ वर्षीय मुलगी घरात एका कोपऱ्यात जाऊन लपली. त्यामुळे आजीने प्रेमाने नातीला का लपली, असा प्रश्न केला. त्यानंतर नातीने घाबरत घाबरत कारण सांगितलं. मुलीच्या उत्तरानंतर आई आणि आजीची पायाखालची जमीन सरकली. गेल्या दोन वर्षांपासून वडील अत्याचार करत असल्याने मुलीने सांगितले.
मुलीने आपबिती सांगितल्यानंतर आई आणि आजीने तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस चौकशीत सांगितलं की, मी दुसरं लग्न केले. माझा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. मला सात वर्षांची मुलगी असताना आरोपीसोबत लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी नराधमाने संधी साधून मुलीवर अत्याचार केला'.
आरोपी मुलीला धमकी देऊन अत्याचार करत होता. पीडित मुलगी आरोपीच्या धमक्यांना घाबरून अत्याचार सहन करत होती. आजीच्या घरी आलेल्या बापाला पाहून पीडित मुलगी घाबरली. त्यानंतर पीडित मुलीने आजीला आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांत पीडित मुलीचा जबाब आणि आजीच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.