Aishwarya Rai: "हीची हेअरस्टाईल बदला रे...", ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या सोहळ्यात ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या एथनिक लूकमध्ये दिसत आहेत.
Aishwarya Rai
Aishwarya RaiSaam Tv

Aishwarya Rai Daugher Trolled: नुकताच मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला देश- विदेशातील अनेक कलावंत, सेलिब्रिटींनी, व्यवसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावलेली होती. बी- टाऊनमधील सेलिब्रिटी स्टार यांनी देखील उपस्थिती लावली होती. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे.

Aishwarya Rai
Movie On OTT: एप्रिल महिन्यात OTTवर या चित्रपटांची मेजवानी; घरबसल्या लुटा दमदार चित्रपटांचा आनंद

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या सोहळ्यात ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या एथनिक लूकमध्ये दिसत आहेत. आई आणि मुलगी या दोघींही इतक्या सुदंर दिसत होत्या साऱ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. आराध्याचा साधेपणा जास्तीचा भाव खाऊन गेला. सोशल मीडियावर अभिनेत्रीची मुलगी आराध्या जबरदस्त चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंवर अनेकांनी बच्चन कुंटुबातील लाडकी मुलगी इतर स्टारकिड्सप्रमाणे नसल्याचे म्हटलं आहे.

Aishwarya Rai
Rashmika Mandanna Love Life: रश्मिकाचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? 'या' तेलुगु अभिनेत्याला करतेय डेट

तर नेटकऱ्यांनी आराध्याला तिच्या हेअरस्टाईलवरून चांगलेच ट्रोल केले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सने अभि-ऐशची मुलगी आराध्याच्या हेअरस्टाईलवर प्रश्न केला आहे. एका नेटकऱ्याने "पर्मनंट हेअरस्टाईल" तर आणखी एकाने "हीची हेअरस्टाईल बदला रे..." असे म्हटलं आहे. आराध्याची लहानपणापासून अशीच हेअरस्टाईल असल्याने ती ट्रोल होत आहे. आराध्या ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर कायमच असते. कधी ती तिच्या स्टाईलमुळे तर कधी आईसोबतच्या तिच्या मस्तीमुळे.

Aishwarya Rai
Deepika Padukone Comment: शाहरुखचा किलर लूक पाहून, दीपिका म्हणते 'मरते की काय'

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर,अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com