
सागर आव्हाड, साम टीव्ही
पुण्यातील हांडेवाडीत महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या हांडेवाडीत एका महिलेला काही महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला. मात्र, पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतरही आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणावरून आरपीआयच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील हांडेवाडीत किरण उनवणे या महिलेला दुपारी २ वाजता राणी हांडे, शोभा हांडे, श्रद्धा हांडे, प्राजक्ता गोगावले, राजश्री गाोगावले या महिलांनी जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. या प्रकारानंतर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येत नव्हता. त्यानंतर आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्याशी न्याय मिळण्यासाठी संपर्क साधला. त्यानंतर आरपीआयच्या पाठपुराव्यामुळे काळेपडळ पोलिसांनी हांडे कुटुंबातील सदस्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध गुन्हे दाखल केले. पण अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत.
आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ सुरु आहे, असा आरोप पीडित महिलेने आरपीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. आरोपी मोकाट फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याने किरण महादेव उनवणे आणि त्यांचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहत आहे.
आरोपी स्थानिक असून श्रीमंत आहेत. आरोपींचे राजकीय लागेबांधे असल्याने अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी वानवडी विभाग सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून आरोपीना अटक करण्यास विलंब होतो आहे का? असा सवाल शशिकला वाघमारे यांनी विचारला.
या आरोपींना अॅट्रॉसिटीअंतर्गत अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनला चकरा मारत आहे. या संदर्भात उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार या आरोपींना नोटीस पाठवली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपायुक्त गोडसे यांच्या तपास पथकाकडून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.