Pune Crime: पोलिस खात्यात क्लास १ अधिकाऱ्याची नोकरी देतो, पुण्यात ३० तरुणांची फसवणूक; कोट्यवधीचा गंडा

Two Men Arrested for Pune Job Scam: पुण्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवू ३० तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
Pune Crime: पोलिस खात्यात क्लास १ अधिकाऱ्याची नोकरी देतो, पुण्यात ३० तरुणांची फसवणूक; कोट्यवधीचा गंडा
Pune Crime Saam Tv
Published On

महसूल विभागात सचिव असल्याची बतावणी करत सहाय्यक क्लार्कच्या साथीने सरकारी नोकरीचे आमिष दाखवत दोघांनी ३० जणांना आर्थिक गंडा घातला. महसूल, वनविभाग, पोलिस खात्यात क्लास वन, क्लास टूची नोकरी मिळवून देतो असे सांगून एक लाखांपासून २० लाख रुपयापर्यंत या जोडीने पैसे उकळे आहेत.

तरुणांना विश्वास वाटावा म्हणून दोघांनी चक्क बनावट नियुक्ती पत्रे देखील तयार केली होती. गुन्हे शाखा युनिट- २ च्या पथकाने तोतया सचिव आणि पुणे तसहसीलदार कार्यालयात नियुक्तीस असलेल्या महसूल सहाय्यक क्लार्कला बेड्या ठोकल्या आहेत. महादेव बाबूराव दराडे (३२ वर्षे, राहणार - व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड), रणजीत लक्ष्मण चौरे (३५ वर्षे,राहणार - धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Pune Crime: पोलिस खात्यात क्लास १ अधिकाऱ्याची नोकरी देतो, पुण्यात ३० तरुणांची फसवणूक; कोट्यवधीचा गंडा
Satara Crime : बुरखा परिधान करून मंगळसूत्र तोडून पसार; दोन्ही चोरटे ताब्यात

श्रीगोंदा तालुक्यातील सूरज कैलास पाचपुते (२२ वर्षे) या तरुणाला पोलिस उपनिरीक्षक पदी नोकरी लावतो म्हणून आरोपी दराडेने १० लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे पाचपुते याच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी महादेव दराडेच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Pune Crime: पोलिस खात्यात क्लास १ अधिकाऱ्याची नोकरी देतो, पुण्यात ३० तरुणांची फसवणूक; कोट्यवधीचा गंडा
Amravati Crime : पेट्रोल पंपावरील दरोड्याचे धक्कादायक सत्य आले समोर; पोलिसांकडून तीन तासांत उलगडा, पाच जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com