Satara Crime : बुरखा परिधान करून मंगळसूत्र तोडून पसार; दोन्ही चोरटे ताब्यात

Satara news : सातारा शहरातील शाहूनगर परिसरात एका दुकानात उभे असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बुरख्याचा वेश परिधान करून आलेल्या व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली
Satara Crime
Satara CrimeSaam tv
Published On

सातारा : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र किंवा सोन्याची चैन तोडून चोरटे पसार होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशात सातारा शहरात बुरख्याचा वेश परिधान करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून पसार झाले होते. पोलिसांनी याचा तपास लावत मंगळसूत्र तोडून पसार झालेल्या दोन बुरखाधारी आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. 

सातारा शहरातील शाहूनगर परिसरात एका दुकानात उभे असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बुरख्याचा वेश परिधान करून आलेल्या व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात सातारा पोलिसांनी तपास करत पुणे जिल्ह्यातून पाठलाग करून संशयित दोन आरोपींना पकडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अब्दुल इमाम सय्यद आणि आफताब सलीम शेख या दोघांना अटक करण्यात आले.  

Satara Crime
Pune Accident: रिव्हर्स घेताना अनर्थ घडला, टँकरखाली चिरडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुद्देमालही घेतला ताब्यात 

दरम्यान सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून धारदार हत्यारे, बुरखा, दुचाकी, मोबाईल, चोरीचे दागिने असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Satara Crime
Electric Shock : डीपी दुरुस्तीचे काम करताना विजेचा झटका; युवकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक

शिरूरमध्ये मंगळसूत्र चोरी 

शिरूर (पुणे) : शिरुर तालुक्यातील पुणे- नगर महामार्गावर पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरीची घटना घडली आहे. फलके मळा येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, हॉटेल शिरूर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असूनही चोरी झाली आहे. महिला हॉटेलमध्ये एकटी होती. हे ओळखून चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. या चोरीमागे एक संगठित टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com