Electric Shock : डीपी दुरुस्तीचे काम करताना विजेचा झटका; युवकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक

Dharashiv News : धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे सदरची घटना घडली आहे. गावात महावितरणकडून लाईन दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. विद्युत डीपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : महावितरणच्या लाईनमनच्या हाताखाली मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. डीपी दुरुस्तीचे काम सुरु असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मृताचे नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मध्यरात्रीपर्यंत महावितरणच्या कार्यालयात युवकाचा मृतदेह ठेवून आंदोलन केले. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. 

धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे सदरची घटना घडली आहे. गावात महावितरणकडून लाईन दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. यात गावाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत डीपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करत असताना विद्युत वितरण कंपनीच्या डिपीमध्ये असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसला. यात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Electric Shock
MHADA Home: मुंबईकरांसाठी म्हाडाकडून मोठं गिफ्ट, ५ हजार घरांची बंपर लॉटरी; नाशिक, पुणे अन् संभाजीनगरात मिळणार घरे

मदतीसाठी गेला असता घडली घटना 

बालाजी भालचंद्र जगदाळे असे घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव असुन तो लाईनमनच्या हाताखाली काम करायचा. त्यानुसार गावातील काम असल्याने बालाजी हा मदतीसाठी गेला होता. यातच दुर्दैवी घटना घडली. विजेचा झटका बसल्यानंतर बालाजी याला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

Electric Shock
Viral Video: बापरे! छतावरून उडी घेतली, विजेचा जबरदस्त झटका बसला आणि अचानक...पण पुढे जे घडलं ते पाहून विश्वासच बसणार नाही

महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

सदरील युवक डिपीची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता लाईट बंद न केल्याने करंट लागुन मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा करावा; या मागणीसाठी मृतदेह भुम महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. दरम्यान याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेवुन व अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com