Badlapur Crime : बदलापुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तरुणाकडून आधी अल्पवयीन मुलीचा पाठलाग, नंतर हात पकडला अन्

Badlapur Crime News : बदलापुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुणाने आधी अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर हात पकडून छेड काढल्याचा प्रकार केला आहे.
Badlapur Crime  News
Badlapur Crime Saam tv
Published On

बदलापुरात बिहारमधून आलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. बदलापुरात एका १९ वर्षीय तरुणाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून छेड काढल्याची घटना घडली आहे. विनयभंग प्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या आहेत. बलदापूर पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकारामुळे बदलापुरातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करायचा. तसंच तो तिचा हातही पकडायचा. या प्रकरणी मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Badlapur Crime  News
Leopard Attack : कोंबडीचोर बिबट्या, रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी आला अन्...CCTV व्हिडिओ बघा

धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी या तरुणावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हा तो अल्पवयीन होता. त्या प्रकरणात रिमांड होमला जाऊन आल्यानंतर त्याने पुन्हा तेच कृत्य केलय. तरुणाने पुन्हा केल्याने पोलिसांचा धाक उरला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या प्रकरणानंतर बदलापुरातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Badlapur Crime  News
Nashik Accident : शिर्डीला जाताना मुंबईतील साईभक्तांच्या बसचा अपघात; वाहनाचा अक्षरश: चक्काचूर, थरारक अपघाताचे PHOTO

१३ वर्षीय कॅन्सर पीडित मुलीवर अत्याचार

दरम्यान, बिहारच्या एका १३ वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं. मुलीला उपचारासाठी मुंबईत यायचं होतं. तिला गावा जवळच्याच एका २७ वर्षीय व्यक्तीने बदलापुरात भाड्याने घर घेऊन दिलं. त्यानंतर या नराधमाने मुलीला वासनेची बळी बनवलं. कॅन्सरच्या उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलंय त्यानंतर या नराधमाचं बिंग फुटलं. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी २७ वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com