BJP Politics : भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका; पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

BJP Political update : भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, असं म्हणत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. चंद्रपुरात नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
BJP Politics
BJP Saam tv
Published On

चंद्रपूर : भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने आज पक्षातील गटबाजी खुलेपणाने समोर आल्याचे बघायला मिळाली. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, अशा कानपिचक्या दिल्या. शोभा फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

BJP Politics
BJP Worker: माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्या.., पक्षाच्या नावे चिठ्ठी; भाजप कार्यकर्त्यानं ऑफिसमध्येच संपवलं आयुष्य

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात, तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते.

BJP Politics
Beed News : 'आतमध्ये आहात म्हणून वाचलात'; कराड गँगची महादेव गित्तेला धमकी?

एकाचवेळी एकच पक्षाचे एकच शहरात दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली. कोणत्या नेत्याकडे जावे, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध जोरात रंगू लागले. मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळू नये, यासाठी भाजपच्या याच स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुनगंटीवार हे जोरगेवार, अहिर आणि शोभा फडणवीस यांच्यावर संतापून आहेत. त्यांच्या कार्यक्रमात मुनगंटीवार जाणे अशक्यच होते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला.

BJP Politics
Taj Mahal : ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी? प्रेमाच्या प्रतिकावर कोणाचा मालकी हक्क? वाचा सविस्तर

तर दुसरीकडे शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी या कार्यक्रमात यायला हवे होते, असे म्हणतानाच आपल्या पक्षाला काँग्रेस करू नका, असा टोला त्यांनी लगावला. यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले. शोभा फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com