BJP Worker: माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्या.., पक्षाच्या नावे चिठ्ठी; भाजप कार्यकर्त्यानं ऑफिसमध्येच संपवलं आयुष्य

BJP worker Killed Himself : भाजप कार्यकर्त्यानं आपल्या ऑफिसमध्ये आत्महत्या केलीय. एका सुसाईडस नोटमध्ये आमदारावर गंभीर आरोप केलाय.
Mumbai Malad Crime News
Mumbai Malad Crime NewsSaam TV
Published On

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्याने व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट लिहिलीय, यात त्यांनी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्याचे कायदेशीर सल्लागाराला दोषी ठरवलंय. कायदेशीर सल्लागार ए.एस.पोन्नाना यांच्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा खुलासा भाजप कार्यकर्त्याने आपल्या सुसाई़ड नोटमधून केलाय.

कार्यालयात घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचं नाव विनय के.एस, असं आहे. आज सकाळी विनय के.एस. यांनी आपल्या ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार ए.एस.पोन्नाना यांच्यामुळे आपण चिंतेत राहत होतो, असं भाजप कार्यकर्त्यानं आपल्या सुसाईडस नोटमध्ये म्हटलंय. आत्महत्या करण्यापूर्वी विनय यांनी व्हॉट्सअॅपवर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती. त्यात त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. सुसाईड नोटनुसार, मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार पोन्नाना यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला त्रास दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mumbai Malad Crime News
Dombivali: "माझ्याशी लग्न कर" घटस्फोटीत महिलेवर बलात्कार; डोंबिवलीच्या रीलस्टारचं आणखी एक दुष्कृत्य उघड

भाजप कार्यकर्ते विनय यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्याविरुद्धचा एफआयआर राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. "कोडागू समस्या आणि सूचना" व्हॉट्सॲप ग्रुपमधील एका पोस्टसाठी आपल्याला जबाबदार धरण्यात आले होते, कारण त्या ग्रुपचे अॅडमिन विनय होते.

Mumbai Malad Crime News
Crime News: पत्नीचं अफेअर; नवऱ्याचं डोकं फिरलं, थेट बॉयफ्रेंडचे कानच कापले

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

सुसाईड नोटमध्ये भाजप कार्यकर्ता विनय केएसने लिहिले की, "सर्वांना माझा शेवटचा नमस्कार, मी विनय केएस. राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मला बदनाम करण्यात आलं. तेनिरा महेना हे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. मला जामीन मिळाल्यानंतरही तपासाच्या नावाखाली मडिकेरी पोलिसांनी माझ्या मित्रांचा आणि चुलत भावांचा छळ केला.

विराजपेटच्या आमदाराच्या म्हणण्यानुसार त्रास दिला जातोय,अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली होती. त्यानंतर मी एक व्हॉईस नोट पाठवत पन्नाना यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं. पण त्यांनी मला दोषी ठरवलं. पुढे आपल्या नोटमध्ये विनय यांनी भाजप पक्षाला एक विनंती केलीय. पक्षाने माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कृपया माझी आई, पत्नी आणि मुलीची काळजी घ्यावी, त्यांना आर्थिक मदत करावी.

काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, विनयला मडिकेरी शहर पोलिसांनी अटक केली होती. विनयने काँग्रेस आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार एएस पोन्नाना यांची व्हॉट्सॲप पोस्टद्वारे खिल्ली उडवली होती. मडिकेरी येथील स्थानिक काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर विनयविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com