Beed News : 'आतमध्ये आहात म्हणून वाचलात'; कराड गँगची महादेव गित्तेला धमकी?

Santosh Deshmukh News : कारागृहातही कराडने संतोष देशमुखांच्या हत्येची आठवण करुन देत आणखी एक धमकी दिलीय.. ही धमकी कुणाला दिलीय? आणि यासंदर्भात मीरा गित्तेंनी काय आरोप केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...
Beed
Beed News Saam tv
Published On

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड कारागृहात आहे.. मात्र तुरुंगातही कराडच्या दहशतीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही... त्यातच आता तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर वाल्मिक कराडने आतमध्ये आहात म्हणून वाचलात, नाहीतर संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करुन मारलं असतं. अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेंनी केलाय...

Beed
Leopard Attack : कोंबडीचोर बिबट्या, रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी आला अन्...CCTV व्हिडिओ बघा

वाल्मिक कराड गँगने सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत निघृणपणे हत्या केली. या प्रकरणी कराड बीड कारागृहात आहे.. मात्र बीड कारागृहात महादेव गित्ते गँग आणि कराड गँगमधील टोळीयुद्ध समोर आलं. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना संभाजीनगर जिल्ह्यातील हरसूल कारागृहात हलवण्यात आलं.

Beed
Badlapur Crime : बदलापुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तरुणाकडून आधी अल्पवयीन मुलीचा पाठलाग, नंतर हात पकडला अन्

मात्र महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेंनी थेट कारागृह प्रशासनावर हल्लाबोल करत सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केलीय...त्यामुळे कारागृहातील सीसीटीव्हीमुळे वाल्मिक कराड आणि तुरुंग प्रशासनाचा भांडाफोड होणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com