Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल
Uttar Pradesh Saam Tv

Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल

Varanasi Hotel Brother Sister End Life Case: वाराणसीमधील एका हॉटेलमध्ये बहीण-भावाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ते मूळचे हैदराबाद येथील होते. गंगा नदीत मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी ते आले होते.
Published on

Summary -

  • वाराणसीतील हॉटेलमध्ये बहीण-भावांचे मृतदेह आढळले

  • दोघेही हैदराबादहून आले होते

  • दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला

  • बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी ते वाराणसीला आले होते

  • घटनास्थळी सुसाईड नोट आणि काही औषधं सापडली

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील एका हॉटेलमध्ये बहीण-भावांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. हैदराबादमधून बहीण-भाऊ वाराणसीमध्ये आले होते. गणेश गौड (४६ वर्षे) आणि धनलक्ष्मी (३८ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या बहीण- भावांची नावं आहेत. आपल्या मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी दोघे वाराणसी येथे आले होते. कँट बस स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये त्यांनी खोली बुक केली होती. त्याठिकाणीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

१० फेब्रुवारीला गणेश गौड यांच्या बहिणीचा तेरावा होता. त्याच दिवशी सकाळी त्यांना हॉटेलमधून चेक आऊट करायचे होते. त्यांचा प्लान होता की चेक आऊट करण्यापूर्वी गंगा नदीत अस्थी विसर्जन करून धार्मिक विधी करायचा. पण ते सकाळी खोलीतून बाहेर आलेच नाही. दुपार झाली तरी ते खोलीतून बाहेर आले नाही त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीत कॉल केला तर काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.

Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल
Crime: १००० रुपयांत बायकोला विकलं, जंगलात नेलं; नवऱ्याच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तर गणेश गौड आणि त्यांच्या बहिणीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. खोलीतील टेबलावर पाण्याची बाटली, विविध गोळ्या आणि औषधांची पाकिटं आढळून आली. घटनास्थळावरून पोलिसांनी औषधं, सहा लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि एटीएम जप्त केले.

Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल
Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर

घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली त्यामध्ये 'Forgive Us' आणि 'Sorry' असे लिहिण्यात आले होते. पोलिस हा एक महत्वाचा पुरावा मानत आहेत. हे आत्महत्याचे प्रकरण वाटत आहेत. पोलिस या दुहेरी आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समोर येईल. हे दोघेही मूळचे हैदराबादचे होते. पोलिस त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल
Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com