Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...

Navi Mumbai Crime: नवी मुंबईमध्ये एका पोलिसाने बायकोच्या कथित बॉयफ्रेंडची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहासोबत १९१ किलोमीटरचा प्रवास केला. मृतदेह जाळून विहिरीत टाकण्यात आला.
Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...
Navi Mumbai Crime Saam Tv
Published On

Summary -

  • नवी मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने बायकोच्या कथित बॉयफ्रेंडची हत्या केली

  • मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी १९१ किमी प्रवास केला

  • सातारा जिल्ह्यातील विहिरीत मृतदेह जाळून फेकला

  • सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या तीन दिवसांत गुन्हा उघडकीस

नवी मुंबईमध्ये भयंकर हत्याकांडाची घटना घडली. एका पोलिसाने बायकोच्या कथित बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहासोबत तब्बल १९१ किलोमीटरपर्यंत प्रवास केला. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील सुखेड गावात मृतदेह जाळून विहिरीमध्ये फेकून देण्यात आला. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीला लोणंदजवळच्या सुखेड गावातील शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनाला पाठवत तपास सुरू केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ३ दिवसांत प्रकरणाचा छडा लावला. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहचले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. नवी मुंबईतल्या कळंबोली येथे या तरुणाची चार जणांनी गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह लोणंदमध्ये आणत विहिरीत फेकला होता.

Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...
Crime: १००० रुपयांत बायकोला विकलं, जंगलात नेलं; नवऱ्याच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

ज्या कारमधून मृतदेह आणण्यात आला होता त्या कारपर्यंत पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोहचले. ही कार पुण्यातील होती. त्यानंतर या संपूर्ण हत्याकांडामागची धक्कादायक माहिती उघड झाली. बंडू भिसे या पोलिसाने मित्रांच्या मदतीने तरुणाची हत्या केली. भिसे हा रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. भिसे कळंबोलीतील रोडपाली येथे राहत होता. त्याचठिकाणी राहणाऱ्या सोमनाथ बोबडे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यांच्या सतत भेटीगाठी सुरू होत्या. अशात भिसेला आपल्या बायकोचे आणि सोमनाथचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला.

Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...
Crime News: निवडणुकांच्या दोन दिवसाआधी हिंदू व्यापाऱ्याची हत्या; बांगलादेशात खळबळ

भिसेने आपल्या मित्रांच्या मदतीने सोमनाथची गळा आवळून हत्या केली. हत्येचे पूरावे नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मृतदेह लोणंदच्या सुखेड गावाच्या हद्दीत असलेल्या आहिरे खिंड येथील चोपडे वस्तीजवळ आणला. याठिकाणी असलेल्या विहिरीच्या कठड्यावर सोमनाथच्या मृतदेहावर पेट्रोल टाकले आणि मृतदेह पेटवून देत विहिरीत टाकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी भिसे आणि त्याच्या पुणे येथे राहणाऱ्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे नवी मुंबईसह सातऱ्यातील लोणंदमध्ये एकच खळबळ उडाली.

Crime: पोलिसाचा खुनी खेळ! बायकोच्या कथित बॉयफ्रेंडला नवी मुंबईत संपवलं, मृतदेहासोबत १९१ किमीचा प्रवास नंतर...
Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com