पराग ढोबळे, नागपूर साम टीव्ही प्रतिनिधी
Umesh Shelke Nagpur police officer accused of sexual assault : साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्याकडून बलात्कार अन् मानसिक त्रास दिल्याचे प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाय. महिला डॉक्टरने फलटणमधील नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्याआधी हातावर पीएसआय बदने याचे नाव लिहिले होते. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच खाकीवर नागपूरमध्येही डाग लागल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक छळाचे आरोप गाजत असताना उपराजधानी नागपूरातही एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणीकडून लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. २३ वर्षाच्या तरूणीच्या आरोपानंतर नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उमेश शेळके असं आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप पोलिसावर केला आहे. नागपूर पोलिसाकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. यामध्ये किती तथ्य आहे, याचा तपास करण्यात येतोय.
उमेश शेळके याच्या विरोधात 23 वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यापूर्वी तक्रार दिली आहे. उमेशने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा त्यामध्ये आरोप कऱण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही आरोपी विरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा पीडित तरुणीने आरोप केला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला पोलीस आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तीन आठवडे होऊनही शोधण्यात अपयशी ठरले आहे. शेळके फरार झाला आहे, एवढंच उत्तर पोलिसांकडून दिल जात असल्याचे तरूणीने म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.