Montha cyclone Maharashtra IMD warning : मान्सून महाराष्ट्रातून परत गेलाय. पण पावसाने मात्र अद्याप काढता पाय घेतलेला नाही. दिवळीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पूर परिस्थितीतून सावरणाऱ्या महाराष्ट्रावर आता मोंथा चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याने कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे पुढील ४८ तास राज्यात धो धो पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आळा आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होतेय. या चक्रवादळाला थायलंडने 'मोंथा' हे नाव सुचवलेल आहे. मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील ३८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मोंथा चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत आहे. पण याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्याशिवाय आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय.
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारी भागात सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार,मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.'मोंथा' चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यात पावसाचे संकट आलेय. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतही काही भागांत पावसाचा अंदाज आहे.तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.