मर्यादा ओलांडल्या! भाजप नेत्याने शेतकर्‍याला कारखाली चिरडून मारले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

BJP leader crushes farmer to death in Madhya Pradesh : मध्य प्रदेशात भाजप नेत्याने जमीन वादातून शेतकऱ्याला थार कारखाली चिरडून ठार केलं. मुलींना वाचवायला गेल्यावर आरोपींनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याने संताप उसळला आहे.
Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer
Madhya Pradesh horror: BJP leader Mahendra Nagar runs over farmer with Thar; daughters assaulted during rescue attempt.सोशल मीडिया
Published On

Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer : शेतकऱ्यावर गुंडगिरी करताना भाजप नेत्याने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्याचा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. जमिनीच्या वादातून गुनामधील एका भाजप पदाधिकाऱ्याने शेतकऱ्याची कारखाली चिरडून निर्घृण हत्या केली आहे. संतापजनक म्हणजे, बापाला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींसोबतही आरोपींनी भयंकर कृत्य केले. त्यांनी मुलींचे कपडे फाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुनामधील गमेशपुरा गावातील भाजप पदाधिकारी महेंद्र नागर याच्यासह १४ जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात अन् जिल्ह्यात तणावाचे वातावरम झालेय.

शेतकऱ्याला थार कारखाली चिरडून मारल्याची घटना रविवारी रात्री घडली. मृत शेतकर्‍याचे नाव रामस्वरूप असल्याचे समजतेय. मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप पत्नीसह शेतातून जात होते. त्याचवेळी भाजप नेत्याने आपल्या टोळक्यासह त्याला घेरले आणि हल्ला केला. आरोपींनी शेतकऱ्याला आधी बेदम मारले. त्यानंतर थार कारने चिरडून निर्घृण खून केला. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. रामस्वरूप याला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींचे कपडेही त्यांनी फाडले.

Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer
अमित शहांचा मुंबई दौरा, मोहोळ विमानतळावर; शिंदेंचा धंगेकरांना निरोप! पुण्यातील जैन हॉस्टेल प्रकरणी "ट्विस्ट" आणला का घडवला?

शेतकऱ्याच्या मुली वडिलांना आरोपींच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावल्या. त्यावेळी त्या मुलीसोबत भयानक कृत्य केले. आरोपी महेंद्र नगर याने त्यांचे कपडे फाडले आणि दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. जखमी शेतकऱ्याला वैद्यकीय उपचार मिळू नयेत म्हणून मृतदेहाला एक तासासाठी गावातून बाहेर पडू दिले नाही.या धक्कादायक घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. आरोपी महेंद्र नगर आणि तीन महिलांसह १४ जणांविरुद्ध पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महेंद्र याची गावात गुंडागर्दी अन् दहशत इतकी आहे की, एकजणही बोलण्यास तयार नाही.

Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer
Cyclone Alert : देशावर 'मोंथा'चं संकट, ११० च्या स्पीडने येतंय चक्रीवादळ, IMD कडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट

आरोपी महेंद्र नगर हा गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना धमकावून जमीन बळकावतो. गावातील शेतकरी त्याला जमीन विकून दुसरीकडे निघून गेले. पण त्याच्या या भयानक कृत्याला रामस्वरूप या शेतकऱ्याने विरोध केला. त्यामुळे आरोपीने त्याची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गणेशपुरा गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांची जमीन त्याने कवडीमोल भावात विकत घेतली.

Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer
Election Commission PC : निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, कोणती मोठी घोषणा होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com