

Election Commission press conference today live updates : निवडणूक आयोग आज दुपारी सव्वाचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR संपूर्ण देशभरात (SIR voter list) करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आगामी काळात ज्या राज्यात विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) आहेत, त्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असू शकतो. पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात असण्याची शक्यताय. याशिवाय आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीचा देखील समावेश असू शकतो. (Election Commission May Announce Nationwide Voter List Revision (SIR) Today)
मतदार यादीवरून विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपाचे उत्तरही निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विरोधकांकडून आयोगाच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील विरोधकांकडून मतदार यादी व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. ठाकरे बंधूंसह काँग्रेस, राष्ट्रवादीने आयोगाला धारेवर धरले होते. यावरही आयोगाकडून आज उत्तर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत ३ दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत SIR प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली आणि ती सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेला २४ जून ते ३० सप्टेंबर असा जवळपास चार महिने वेळ लागला. हा वेळ कमी करण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज याबाबतही सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.