Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

Todays Gold Rate : दिवाळीमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. चार दिवसात सोन्याची किंमत सात हसार रूपयांनी घसरली आहे.
Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर
Today Gold RateSaam Tv
Published On

Gold Price Today Down – Check 24K & 22K Rate : ऐतिहासिक झेप घेतलेल्या सोन्याचा दर गेल्या आठवड्यात घसरल्याचे पाहायला मिळाले. चार दिवसात सोन्याची किंमत प्रति तोळा ७ हजार रूपयांनी स्वस्त झालेय. आंतरराष्ट्रीय बाजार, मस्टी कमोडिटी एक्सजेंच आणि देशांतर्गत मार्केटमध्येही सोन्याची किंमत कमी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख ३० हजार रूपयांपर्यंत पोहचली होती. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं एक लाख २३ हजार रूपये प्रति तोळ्यावर आले आहे.

एमसीएक्सवर किती स्वस्त झालं सोनं?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच, MCX वर सोन्याच्या किंमतीमध्येही घसरण झाली आहे. सोमवारी 999 शुद्धताचे सोने प्रति तोळा 1,30,624 रुपये इतके होते. त्यानंतर अचानक सोन्याच्या किंमतीत घसरण आली. शुक्रवारपर्यंत सोन्याची किंमत 1,23,255 रुपये प्रति तोळा झाले. एमसीएक्सवर सोनं पाच दिवसात 7,369 रुपयांनी प्रति तोळा स्वस्त झाले.

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर
BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

देशांतर्गत मार्केटमध्ये किती स्वस्त झाले सोनं?

फक्त MCX वरच नव्हे तर देशांतर्गत मार्केटमध्येही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संकेतस्थळ IBJA.Com नुसार, सोन्याच्या किंमतीत आठवडाभरात घसरण झाली आहे. सोमवारी सराफा बाजार सुरू झाला, त्यावेळी २४ कॅरेट सोन्याची किंमत 1,27,633 रुपये प्रति 10 ग्राम इतकी होती. दुसऱ्या दिवळी सराफा बाजार बंद होता. पण ज्यावेळी बुधवारी सुवर्णबाजार सुरू झाला त्यावेळी मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याची किमत घसरून 1,21,518 रुपयांवर आली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोनं प्रति तोळा 6,115 रुपयांनी स्वस्त झाले.

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर
Phaltan Doctor Death Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! गोपाळ बदनेचं आत्मसमर्पण, तपासाला वेग

१८,२२ आणि २४ कॅरेटच्या सोन्यामध्ये गेल्या आठवड्यात अचानक घसरण पाहायला मिळाली आहे. पुढील आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता असल्याचे अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.दरम्यान, देशभरात प्रत्येक शहरात सोन्याचे दर एकसारखे आहेत. पण ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जमुळे प्रत्येक शहरात सोन्याची किंमत कमी जास्त होते. शहरानुसार मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात, त्यामुळे किंमतीमध्येही फरक जाणवतो.

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर
Rain Update : महाराष्ट्रावर अवकाळीचं सावट, ५ दिवस या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा कुठे कुठे धो धो कोसळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com