Mumbai Crime : मुंबईतील धक्कादायक घटना! जुहू चौपाटीवर गोणीत आढळला मृतदेह

Juhu Koliwada Jetty Crime News : मुंबईतील जुहू कोळीवाडा समुद्रकिनारी जेटीजवळ गोणीत भरलेला मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपास सुरू आहे.
Juhu Koliwada Jetty Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • जुहू कोळीवाडा समुद्रकिनारी गोणीत मृतदेह आढळला

  • मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, डोक्यावर जखमा

  • हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा संशय

  • सांताक्रूझ पोलिसांकडून तपास सुरू

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

संजय गडदे, मुंबई

एककीकडे सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु असून तरुण मंडळी हे दिवस आनंदात साजरा करत आहेत. एकत्र वेळ घालवण्यासाठी गार्डन, हॉटेल, तसेच मुंबईच्या समुद्र किनारी अनेक जोडपी पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गजबजलेल्या जुहू कोळीवाडा समुद्रकिनारी जेटीजवळ गोणीत भरलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जुहू कोळीवाडा समुद्रकिनारी जेटीजवळ गोणीत भरलेला मृतदेह आढळला. मृतदेह अंशतः कुजलेल्या अवस्थेत असून मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर जखमा आणि गळा चिरलेला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हत्या करून संशय येऊ नये म्हणून हा मृतदेह गोणीत भरून फेकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Juhu Koliwada Jetty Crime News
Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव, वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास

दरम्यान याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून सांताक्रूझ पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. शिवाय मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भरवस्तीत, गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे मृतदेह सापडणे म्हणजे मुंबईकर खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.

Juhu Koliwada Jetty Crime News
HSC Exam 2025-26 News : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा, १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

या घटनेमुळे मुंबईत वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे? या तरुणाची हत्या का झाली याचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com