Crime News: निवडणुकांच्या दोन दिवसाआधी हिंदू व्यापाऱ्याची हत्या; बांगलादेशात खळबळ

Brutal Killing of Hindu Trader: बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवसाआधी अज्ञात हल्लेखोरांनी एका हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या केली.
Brutal Killing of Hindu Trader:
Police personnel investigating the murder of a Hindu trader in Mymensingh district of Bangladesh ahead of elections.saam tv
Published On
Summary
  • बांग्लादेश निवडणुकीपूर्वी हिंसाचाराची धक्कादायक घटना

  • हिंदू व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करून दुकान बंद केले

  • हल्लेखोरांकडून लाखो रुपयांची लूट

बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवसाआधी ९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या केली. ही घटना मैमनसिंग जिल्ह्यात घडलीय. सुशेन चंद्र सरकार (६२) हे दक्षिणकांडा गावात तांदळाचे व्यापारी होते. तो बाजार चौकात ‘भाई भाई एंटरप्राइज’ नावाचे दुकान चालवत होता. दरम्यान याच मैमनसिंग जिल्ह्यात येथेच दीपू चंद्र दास या दुसऱ्या हिंदू व्यक्तीला मारहाण करून ठार मारण्यात आल होतं.

Brutal Killing of Hindu Trader:
Shocking: भिंतीवर कारण लिहिले, व्हिडिओही काढला; आई-वडील अन् ३ मुलांची सामूहिक आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या रात्री ११ वाजता बाजार चौकात घडली. अज्ञात हल्लेखोरांनी सरकारवर धारदार शस्त्राने हल्ला केला, त्याला दुकानात सोडून दिले आणि शटर बंद केले. हत्येनंतर त्यांनी दुकानातून लाखो रुपये लुटले. सुशेन सरकार घरी परतला नसल्यान व्यापाऱ्याचे कुटुंबीय त्याला शोधू लागले. ते दुकानाकडे आले त्यावेळी त्यांना सुशेन रक्त्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

Brutal Killing of Hindu Trader:
Shocking: भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची कॅनडामध्ये हत्या, शॉपिंग मॉलमध्ये गोळ्या झाडून संपवलं

कुटुबियांनी त्याला ताबडतोब मैमनसिंग मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. व्यावसायिकाच्या कुटुंबाने सांगितले की मारेकऱ्यांनी त्याची हत्या केल्यानंतर दुकानातून पैसे चोरले. ते बराच काळापासून तांदळाचा व्यवसाय करत होते, त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते, अशी माहिती घरच्यांनी दिली.

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या निर्घृण हत्येनंतर पिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती साहा या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. आता एका व्यापाऱ्याची हत्या झाली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पलाश कांती साहा यांच्या हत्याचा व्हिडिओ भाजप नेते अमित मालवीय यांनी एक्सवर शेअर केला होता.

२७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पिरोजपूर जिल्ह्यातील दुमुरिया गावात राहणाऱ्या इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले होते. हल्लेखोरांनी पलाश कांती साहा यांना त्यांच्या घरात कोंडलं. त्यानंतर त्यांच्या घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com