Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर

Minor Girl Phisucally Assaulted by 5 persons: अमरावतीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीचं अपहरण करत तिच्यावर ५ तरुणांनी भयंकर कृत्य केले.
Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर
Amravati CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • अमरावतीमध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

  • शाळेतून घरी जात असताना या मुलीचे अपरहण करण्यात आले

  • ५ तरुणांनी या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला

  • पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. ५ नराधमांनी या मुलीला बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तुझे मुलांसोबत लफडे आहे. आम्ही तुझी बदनामी करू, अशी धमकी देऊन आरोपींनी पीडित मुलीसोबत वारंवार हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला बदनामीची भीती दाखवत ५ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी ३ महिन्यांची गरदोर राहिली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात ९ फेब्रुवारीला पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होते. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर
Crime: १००० रुपयांत बायकोला विकलं, जंगलात नेलं; नवऱ्याच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. त्यावेळी साईनाथ (१८ वर्षे) आणि अजिंक्य (१८ वर्षे) या दोन मुलांनी पीडित मुलीला रस्त्यात अडवले. तुझे मुलांसोबत लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी त्याने दिली. पीडितेला आरोपींनी विरूळ रॉघे मार्गावरील एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर कार्तिक शेलोकार (१८ वर्षे), साहिल (१८ वर्षे) आणि संकेत काळे (२२ वर्षे) हे तिघे घटनास्थळी आले. त्यांनी देखील पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला.

Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर
Crime News : बायकोचा चहा करायला नकार, नवऱ्याची सटकली, पोरांसमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

आरोपी पीडित मुलीला सतत धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. आरोपींनी पीडितीचं जगणं नकोसे केले होते. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या घटनेमुळे अमरावती हादरली आहे.

Amravati Crime: अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार, पीडिता ३ महिन्यांची गरोदर
Crime News: निवडणुकांच्या दोन दिवसाआधी हिंदू व्यापाऱ्याची हत्या; बांगलादेशात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com