Crime News : धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, डोक्याला बंदूक लावली अन्....

Kerala Thiruvalla Spa Centre News : केरळमधील थिरुवल्ला येथील स्पा सेंटरमध्ये खंडणी न दिल्याने महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत.
Crime News : धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, डोक्याला बंदूक लावली अन्....
Kerala Thiruvalla Spa Centre NewsSaam Tv
Published On
Summary
  • थिरुवल्ला स्पा सेंटरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना

  • खंडणी न दिल्याने महिलेला लक्ष्य केल्याचा आरोप

  • बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद

  • दोघांना अटक, चार आरोपी फरार

  • पोलीस तपास सुरु

केरळमधील थिरुवल्ला येथील एका स्पा सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याने, एका स्पा सेंटरमधील महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.धक्कादायक म्हणजे हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेवर अत्याचार करताना त्याचे व्हिडिओ आणि सेल्फी काढले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर ४ जण फरार आहेत. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी थिरुवल्ला येथील एका स्पा सेंटरमध्ये ६ जणांच्या ग्रुपने अचानक घुसखोरी केली. ही टोळी काही काळापासून स्पा व्यवस्थापनाला त्रास देत होती. शिवाय ५०,००० हजार रुपयांची मागणी देखील करत होती. मात्र वारंवार स्पा सेंटरचे मालक आणि कर्मचारी त्यांना पैसे देण्यास नकार देत होते.

Crime News : धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, डोक्याला बंदूक लावली अन्....
KDMC News : अरेरे! कल्याण डोंबिवली महापौर बंगल्याची वाईट अवस्था; केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी

१ फेब्रुवारी रोजी दुपारी मात्र या टोळीने स्पा सेंटरमध्ये गोंधळ घातला. शिवाय हातातील शस्त्रांनी कर्मचाऱ्यांना धमकावलं. यानंतर या टोळीतील एक गुंड महिलेला शेजारील रूममध्ये जबरदस्ती घेऊन गेला. तिच्यावर बंदूक रोखत, धमकावत तिला स्पा बेडवर ढकलले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Crime News : धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, डोक्याला बंदूक लावली अन्....
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

धक्कादायक म्हणजे आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण केले, सेल्फी काढले आणि महिलेवर हल्ला केला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर ४ जण अद्यापही फरार आहेत. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून या घटनेतील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com