

मध्य प्रदेशमधून धक्कादायक प्रकार समोर
खांडव्यात बनावट तूप कारखान्यावर छापा
प्राण्यांच्या चरबीपासून तूप तयार केले जात होते
गावरान तूपाच्या नावाखाली या तुपाची होत होती विक्री
तुम्ही प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेलं तूप खाताय. ऐकून धक्का बसेल पण हे अगदी खरंय. प्रशासनाने एका कारखान्यावर धाड टाकून बनावट तूप बनवण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आणलाय. कुठे घडलीये ही घटना? किती वर्षांपासून सुरु होता हा धक्कादायक प्रकार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
सण-उत्सवाच्या काळात आपण मोठ्या आवडीने तूप खरेदी करतो, पण हेच तूप तुमच्या आरोग्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. मध्य प्रदेशातील खांडवामध्ये प्रशासनाने एका अशा कारखान्यावर छापा टाकलाय, गावरान तूप नव्हे तर थेट जनावरांची चरबीचं सापडलीय. जनावरांची हाडं, चामडं आणि चरबी उकळून त्यापासून भेसळयुक्त तूप बनवण्याचा हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानं संपूर्ण देश हादरलाय. नेमका हा प्रकार काय आहे. पाहूयात...
खांडवा शहरातील इमिलीपुरा भागात अनेक दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी तक्रार दिली. मात्र वारंवार तक्रार देऊनही याप्रकरणात प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही. अखेर संतापलेल्या नागरिकांनी रेटा लावला आणि शहर दंडाधिकारी, पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने 'बेगम पार्क' परिसरातील तूप बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली.
या धाडीत तब्बल 1380 किलो जनावरांची चरबी, 2700 लिटर चरबीचं तेल आणि 8 क्विंटल हाडं आणि चामडं जप्त करण्यात आलं.2015 पासून म्हणजे तब्बल 11 वर्षांपासून हा कारखाना या भागात असूनही प्रशासनाला याची कुठलीच माहिती नव्हती. या कारखान्यात तूपसदृश्य पदार्भ तयार करण्यासाठी 138 जनावरांची कत्तल केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.
प्राण्यांची चरबी मोठ्या कढईत तापवून, त्यापासून तुपासारखा दिसणारा पदार्थ तयार केला जायचा आणि तो बाजारात गावरान तूप म्हणून विकला जात होता.. आता खांडव्यातील या कारवाई नंतर भेसळमाफियांचे धाबे दणाणलेत. याप्रकरणात जप्त केलेले नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले असून अहवालानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.