सत्तास्थापनेचा दावा, उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; बिहारचे 'सम्राट' किती शिकलेत?

Samrat Choudhary Education Qualification Details: नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये मोठा राजकीय बदल घडला असून सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे.
Samrat Choudhary likely to take oath as Bihar Chief Minister after Nitish Kumar’s resignation.
Samrat Choudhary likely to take oath as Bihar Chief Minister after Nitish Kumar’s resignation.saam tv
Published On

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आज सकाळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सम्राट चौधरी यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी सुमारे 11 वाजता सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Samrat Choudhary likely to take oath as Bihar Chief Minister after Nitish Kumar’s resignation.
Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपावला. दरम्यान, बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नावही निश्चित झाले आहे. भाजप नेते सम्राट चौधरी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळनेतेपदी निवड झाली. तर, सम्राट चौधरी किती शिकले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

Samrat Choudhary likely to take oath as Bihar Chief Minister after Nitish Kumar’s resignation.
Shocking : कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; १० कामगारांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी

सम्राट चौधरी यांचे शिक्षण किती?

सम्राट चौधरी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठातून प्री-फाउंडेशन कोर्स (PFC) पूर्ण केला आहे. त्यांच्याकडे डॉक्टर ऑफ लिट. पदवी आहे.

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यावर सम्राट काय म्हणाले?

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर सम्राट म्हणाले, माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी पक्षाचा मनापासून आभारी आहे. माझ्यासाठी हे केवळ एक पद नाही, तर बिहारच्या जनतेचा विश्वास आणि स्वप्ने पूर्ण करण्याची ही एक पवित्र संधी आहे. मी पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची शपथ घेतो. आपले तेजस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि आपले माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली, मी बिहारला विकास, सुशासन आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करत राहीन. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे. अशी प्रतिक्रिया सम्राट चौधरी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com