राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Bihar CM Samrat Choudhary: नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. बिहारमधील ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. उद्या ते शपथ घेतली.
Bihar CM Samrat Choudhary
samrat choudharySaam Tv
Published On

Summary -

  • सम्राट चौधरी होणार बिहारचे मुख्यमंत्री

  • नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

  • बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे

  • सम्राट चौधरी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील

Samrat Choudhary: बिहारच्या राजकारणात 'नितीश युग' संपून आता 'सम्राट युग' सुरू झाले आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. बिहारच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून धाकट्या भावाची भूमिका बजावणारा भाजप पक्ष आता बिहार राज्य चालवणार आहे. बिहारला पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचे सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यांची विधानसभेतील गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर या बैठकीत त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा करण्यात आली. जवळपास दोन दशके मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी राज्यपालांकडे सोपवला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Bihar CM Samrat Choudhary
Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दलातून केली होती. आज ते बिहारचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री म्हणून इतिहास रचणार आहेत. ते बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरी आता बिहारमधील एनडीए सरकारची सूत्रे स्वीकारतील. नितीश कुमार केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती.

Bihar CM Samrat Choudhary
Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

सम्राट चौधरी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६८ रोजी बिहारच्या मुंगेरमधील लखनपूर गावात झाला होता. त्यांना राजकारणाचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे बिहारच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी समता पक्षाची स्थापना करताना नितीश कुमार यांना पाठिंबा दिला होता. त्यांचे वडील ७ वेळा आमदार आणि खासदार होते. तर त्यांच्या आई पार्वती देवी यादेखील राजकारणात सक्रीय होत्या. लहानपणापासूनच सम्राट यांनी राजकारणातील चढ-उतार पाहिले.

Bihar CM Samrat Choudhary
Bihar New CM : कौन आइल बा...मुख्यमंत्री राजीनामा देणार, बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? शपथविधीची तारीख ठरली

सम्राट चौधरी यांचे खरे नाव राकेश कुमार आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९० सालापासून झाली. ते राष्ट्रीय जनता दल पक्षातून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. वयाच्या ३१ व्या वर्षी ते कृषीमंत्री झाले होते आणि ते सर्वात तरुण मंत्री होते. महत्वाचे म्हणजे सम्राट चौधरी हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. २०१७ मध्ये सम्राट चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Bihar CM Samrat Choudhary
Bihar Politics: मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? बिहारमध्ये भाजपने खेळला मोठा डाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com