Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

Bihar Politics Nitish Kumar : राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. या निर्णयामुळे राज्यात मोठे राजकीय फेरबदल घडून येऊ शकतात.
Bihar Politics Nitish Kumar :
Nitish Kumar likely to resign as Bihar Chief Minister after Rajya Sabha election.saam tv
Published On
Summary
  • नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

  • राज्यसभेवर निवडून आल्यानंतर निर्णय

  • बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ शक्य

राज्यातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. कार्यकर्त्यांचा विरोध डावलत मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या सोमवारी विधान परिषदेचा राजीनामा देणार आहेत. या निर्णयामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते राज्यसभेचे सदस्य म्हणून आपला कार्यकाळ सुरू करतील.

Bihar Politics Nitish Kumar :
Maharashtra Politics: राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार; शिवसेना खासदारचा दावा

जेडी(यू) कार्यकर्ते या निर्णयाला विरोध करत आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी आधीच आपला निर्णय घेतला असल्याचं बिहारचे आमदार अनंत कुमार सिंह म्हणाले. आमदार अनंत कुमार सिंह यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्य वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जेडीयू आमदाराच्या हवाल्याने म्हटले आहे की, "हो, ते राजीनामा देत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये, अशी सर्वांची इच्छा होती, पण ते सहमत नव्हते."

Bihar Politics Nitish Kumar :
Political News : भाजपला मोठा हादरा; ३ बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री, राजकीय समीकरण बदलणार

दरम्यान नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार आहे, याबद्दल बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना हे पद देऊ केले जाऊ शकते, असे वृत्त होते. नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात तसे संकेतही दिले होते. बिहारमधील जमुई आणि नवादा येथे आयोजित 'समृद्धी यात्रे'दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्या खांद्यावर हात ठेवून, जनतेला त्यांच्या समर्थनार्थ हात वर करण्यास सांगितले होते. यावरून तेच बिहारचे मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले होते.

नितीश कुमार यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हेदेखील विधानसभेचा राजीनामा देणार आहेत. नवीन हे पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. १६ मार्च रोजी नवीन यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com