Bihar Politics: मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? बिहारमध्ये भाजपने खेळला मोठा डाव

Who Is Bihar New CM: बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नितीश कुमार १४ एप्रिल रोजी राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यासाठी शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Who Is Bihar New CM:
Shivraj Singh Chouhan likely to announce Bihar’s next Chief Minister amid leadership change buzz.Saam Tv
Published On
Summary
  • बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलाची शक्यता

  • नितीश कुमार १४ एप्रिलला राजीनामा देणार

  • शिवराज सिंह चौहान निरीक्षक म्हणून नियुक्त

नितीश कुमार हे आपल्या सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक 14 एप्रिल रोजी घेणार आहेत. त्याच दिवशी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. या सगळ्यात विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Who Is Bihar New CM:
Nitish Kumar Oath : मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली खासदारकीची शपथ; राजकारणात केला आगळावेगळा विक्रम

शिवराज सिंह चौहान हे बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करतील. ही माहिती भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. जरी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या आणि नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नाही आहेत. परवा १४ एप्रिलच्या रोजी नितीश कुमार यांनी बिहार सरकारच्या अधिकृत पत्रानुसार,मुख्य सचिवालयातील मंत्रिमंडळ कक्षात १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

Who Is Bihar New CM:
भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळात शोककळा

शिवराज सिंह चौहान हे भाजपच्या संकट व्यवस्थापन आणि संघटनात्मक बाबींमधील एक अनुभवी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी अनेक राज्यांमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी दीर्घकाळापर्यंत मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री पद संभाळलं होतं.

त्यामुळे त्यांना आमदारांशी समन्वय साधण्याच्या कलेत ते प्रावीण आहेत. पक्षाने विविध राज्यांमध्ये नेतृत्व निवडीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून विश्वास दाखवला आहे. एक संतुलित आणि एकमत घडवणारे नेते म्हणून त्यांची असलेली ख्याती त्यांना बिहारमध्येही एक महत्त्वाचे खेळाडू बनवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com