Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Petrol Diesel Price Hike in India: पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. Shell India ने पेट्रोलचे दर ७ रुपयांनी तर डिझेल २५ रुपयांनी वाढवले आहेत.
Petrol Disel Rate
Petrol Disel RateSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले

Shell India ने इंधनाचे दर वाढले

वाहनधारकांच्या खिशाला फटका

आखाती देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धांमुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. देशात कच्च्या तेलाची आयात कमी होत आहे. याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होत आहेत. भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी नायरा कंपनीने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केले होते. यानंतर अजून एका कंपनीने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. Shell India ने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. १ एप्रिलपासून हे दर लागू झाले आहेत.

Petrol Disel Rate
Petrol-Diesel Crisis: पेट्रोल मिळत नसल्याने तरुणाची सटकली, थेट दुचाकीच पेटवून दिली; VIDEO व्हायरल

कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. यामुळे प्रायव्हेट इंधन विक्रेत्या कंपन्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक प्रायव्हेट कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरुत पेट्रोलचे दर ७.४१ रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोल डिझेलचे नवे दर काय? (Petrol Diesel New Rates)

आता सामान्य पेट्रोल ११९.८५ रुपये प्रति लिटर आहे तर पॉवर वेरिएंट पेट्रोलची किंमत १२९.८५ रुपये आहे. दरम्यान, स्थानिक भागातील टॅक्समुळे वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे दर वेगळे असणार आहे. डिझेलच्या किंमतीतदेखील वाढ झालीआहे. सामान्य डिझेल १२३.५२ रुपये आहेत तर प्रिमियम डिझेल १३३.५२ रुपये झाले आहेत.

Petrol Disel Rate
Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

पेट्रोलचे दर का वाढतायत? (Why Petrol Diesel Price Hike)

मिडिया रिपोर्टनुसार, इराण-इस्त्रायलमधील युद्धामुळे तेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती अजूनही वाढू शकतात. पेट्रोल डिझेलचे दर १४८ ते १६५रुपयांपर्यंत पोहचू शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, प्रायव्हेट इंधन विक्रेत्या कंपनी या दबावाखाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊनदेखील सरकारी इंधन विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.दरम्यान, प्रायव्हेट कंपन्यांना मात्र फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी किंमतीत वाढ केली आहे.

Petrol Disel Rate
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com