Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी

Russia Blocks Facebook Instagram Youtube: रशिया सरकारने सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय घेत कठोर पाऊल उचलले. रशियामध्ये व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.
Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी
Russia Social Media Ban:Saam Tv
Published On

Summary -

  • रशियात व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर बंदी

  • १० कोटींपेक्षा जास्त युजर्स ब्लॉक झाले

  • राष्ट्रीय डोमेन नेम सिस्टम लागू करण्याचे आदेश

  • आंतरराष्ट्रीय मीडिया वेबसाईट्सही बंदी घालण्यात आली

रशियामध्ये एक मोठा सोशल मीडिया स्ट्राइक झाला आहे. पुतिन सरकाने सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय घेतला. रशियामध्ये व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसह अनेक परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. जवळजवळ १० कोटींपेक्षा जास्त युजर्सला ब्लॉक करण्यात आले आहे. या वेबसाइट्सचे डोमेन नेम रशियाच्या राष्ट्रीय डोमेन नेम सिस्टममधून काढून टाण्यात आले आहे.

रशियातील नागरिकांना स्थानिक सोशल नेटवर्किंग साइट्स उपलब्ध करून देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय सार्वजनिक गोपनीयता राखण्यासाठी आणि गैरवापर होऊ शकणाऱ्या वैयक्तिक डेटा लीक होऊ नये यासाठी घेण्यात आला आहे.

Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी
Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

रशियामध्ये फक्त सोशल मीडियाच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांच्या वेबसाईट्सवरही परिणाम झाला आहे. बीबीसी, ड्यूश वेले, रेडिओ फ्री युरोप, रेडिओ लिबर्टी आणि अनामिक टॉर ब्राउझर देखील ब्लॉक केले आहेत. सरकारने सर्व इंटरनेट प्रदात्यांना राष्ट्रीय डोमेन नेम सिस्टम वापरण्याचे आदेश दिले आहेत. जे देशाच्या सार्वभौम इंटरनेट कायद्यानुसार आवश्यक आहे.

Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी
Social Media: सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याची भीती? 'या' ७ फॉलो टिप्स करा अकाउंट राहील सुरक्षित

२०२१ पासून रशियामध्ये गुगल डीएनएससह इतर डीएनएस सिस्टमच्या वापरावर बंदी घातली. या सर्व डीएनएस सेवांचा वापर करण्यावर हळूहळू प्रतिबंधन करण्यास रशियाने सुरूवात केली होती. आता रशियाने मोठं पाऊल उचलत थेट इंटरनेट नियंत्रणाच्या दिशेने मोठे आणि कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली.

Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी
Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड

रशियाच्या पुतिन सरकारने सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर डेन्मार्क, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. स्पॅनिश सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणाही केली आहे. भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी वाढत आहे. यामागचे कारण म्हणजे लहान मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.

Russia Social Media Ban: रशियात सर्वात मोठा सोशल मीडिया स्ट्राइक, व्हॉट्सअप- इन्स्टाग्राम, फेसबुक अन् युट्यूब प्लॅटफॉर्मवर बंदी
Social Media Ban: भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणार? नेटकरी काय म्हणतात वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com