Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड

Why Australia banned social media for children under 16 : ऑस्ट्रेलिया सरकारनं 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी घातली असून नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 270 कोटींचा दंड ठोठावला जाणार आहे.
Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड
Published On

banned social media News : आता पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी...अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीय...एवढंच नव्हे तर अल्पवयीन मुलं ज्या कंपनीच्या सोशल मीडियावर आढळतील त्यांना शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात य़ेणार आहे? काय आहेत नवे कडक नियम त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

तुमच्या मुलांच्या हातात पेन, पेन्सिल किंवा खेळण्यांची जागा मोबाईलनं कधी घेतली हे कोणालाच सांगता येणार नाही. मोबाईलच्या खेळात सोशल मिडीयावर अँक्टीव्ह झालेल्या मुलांना इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, यूट्यूब, टिकटॉक अशा सोशल मिडीयाचं अक्षरश व्यसनच लागलं. याच सोशल मिडीयापासून लहानग्यांना दूर ठेवण्यासाठी आता मात्र कडक पाऊलं उचलण्यात आलीयेत. आता अल्पवयीन मुलांना सोशल मिडीयाच्या वापरावर बंदी घालण्यात आलीये.

'मुलांना आता नेट बंदी', नेमका निर्णय का घेतला?

16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद

फेसबुक-इन्स्टाग्राम, यूट्यूबसारख्या अॅप्सवरही कडक निर्बंध

नियम न पाळणाऱ्या कंपन्यांना 270 कोटींचा दंड

मुलांना ऑनलाईन धोक्यांपासून वाचवण्याचा सरकारचा उद्देश

मुलांचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय

Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड
खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

जगभरात सध्या सायबर क्राईमच्या घटना क्षणक्षणाला समोर येत आहेत. त्यामुळेच ऑनलाईन वातावरण मुलांसाठी सुरक्षित करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम म्हणावा लागेल. या निर्णयानं या सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी वयोमर्यादा तपासण्यासाठी नवी यंत्रणा उभी करावी लागणार आहे.

Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड
खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी घालणारा जगातला सर्वात मोठा निर्णय हा ऑस्ट्रेलिया सरकारनं घेतलाय. असा निर्णय घेण्याचा प्रयत्न याआधी फ्रान्स, जेर्मनी, इटली, डेन्मार्क आणि मलेशियानं केला. मुलांना सोशल मिडीयाच्या वापरासाठी पालकांची संमती देण्याचे निर्बंध लावण्यात आले. मात्र ऑस्ट्रेलियात संमती वैगेरेची भानगड न ठेवता, कंपन्यांच्या नाराजीला भीक न घालता मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत नो सोशल मिडीया मोहीमेचं कायद्यात रुपांतर करुन ऑस्ट्रेलियाच्या नव्या पिढीसाठी एक मोठा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता या निर्णयाचं इतर देशही अनुकरण करणार का? याचीच आता उत्सुक आहे.

Social Media : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना बंदी, खातं उघडल्यास 270 कोटींचा दंड
CCTV : भाजपकडून बंद खोलीत ४.३० तास बसून मतदार यादीत फेरफार, काँग्रेस नेत्याने पुरावाचे दाखवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com