खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

Maharashtra government EV toll free announcement : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Toll Naka
Toll NakaSaam Tv
Published On

Electric vehicle toll refund rules and process : महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी दिलासादायक अन् आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रिक वाहनांना भरलेला आतापर्यंतचा टोल परत मिळणार आहे. त्याशिवाय राज्यातील कोणत्याही एक्सप्रेसवेवर टोल न घेण्याच्या सूचना राज्य सरकारला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिक वाहनावरील टोलसंदर्भात चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नगर विकास मंत्र्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवरून अल्टीमेटम दिला.

शासनाच्या निर्णायानंतरही इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेणे बेकायदेशीर आहे. राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना (ई-वाहनांना) सर्व ठिकाणी टोल माफी देण्यात आली आहे. शासन धोरण लागू करते आणि ते पाळत नाही हे योग्य नाही. येत्या ८ दिवसात राज्यातल प्रत्येक एक्सप्रेस वे अन् इन हायवेवर टोलमाफी करा. त्याशिवाय चार्जिंग स्टेशन उभारा, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Toll Naka
CIDCO Home : सिडको घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता, एकनाथ शिंदे महत्त्वाचे निर्णय घेणार?

हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिक वाहनांवरील टोल माफीचा प्रश्न आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोल माफी जाहीर केली आहे. यावर आता मागे हटू शकत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्यांना आठ दिवसांच्या आत टोल वसूल न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराला सामावून घेण्यासाठी राज्यभरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्याची आणि ई-वाहन चालकांना सुविधा देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

Toll Naka
CIDCO Home : सिडको घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता, एकनाथ शिंदे महत्त्वाचे निर्णय घेणार?

दादा भुसे काय म्हणाले ?

इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीवर आदी मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. तांत्रिक कारणांमुळे ईव्हीची टोलमाफी अंमलबजावणी तीन महिन्यांनी लांबली आहे. लवकरच प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे दादा भुसे यांनी अश्वासन दिले. विधानसभेत झालेल्या या चर्चेनंतर राज्यातील ई-वाहन चालकांना लवकरच टोलमाफीचा थेट फायदा मिळण्यास सुरुवात होईल.

Toll Naka
Public Holiday List: पुढच्या वर्षी सुट्ट्याच सुट्ट्या! शाळा-ऑफिस कधी राहणार बंद? लाँग वीकेंड किती मिळतील? जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com