Public Holiday List: पुढच्या वर्षी सुट्ट्याच सुट्ट्या! शाळा-ऑफिस कधी राहणार बंद? लाँग वीकेंड किती मिळतील? जाणून घ्या...

Maharashtra Public Holiday List 2026 : महाराष्ट्र सरकारने २०२६ सालासाठीची सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव, शाळा-ऑफिसच्या सुट्ट्या आणि लाँग वीकेंड कधी आहेत, जाणून घ्या...
Public Holiday
Government releases full Public Holiday List for 2026 with multiple long weekends and festival breaks.Saam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षी येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली.

  • अनेक सण आठवड्याच्या शेवटी येत असल्याने लाँग वीकेंडची संधी मिळणार आहेत.

  • प्रवास, कौटुंबिक कार्यक्रम आणि सुट्टीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण कॅलेंडर उपयुक्त आहेत.

2026 Maharashtra public holiday full list : काही दिवसांत आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्याआधीच राज्य सरकारकडून २०२६ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर या काळात येणारे राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि महाराष्ट्रातील खास दिवसांसाठी सुट्ट्यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनापासून ते ख्रिसमसपर्यंत अनेक महत्त्वाचे दिवस सुट्टीचे असतील.

२०२६ मध्ये काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी किंवा जवळ येत आहेत, त्यामुळे फिरण्याचा प्लान करण्यासाठी आताच तारखा नोट करून ठेवा अन् प्लॅन करा. उदाहरणार्थ, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा दोन्ही शुक्रवारी आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार मिळून ३ दिवसांची सुट्टी होईल. २५ डिसेंबर ख्रिसमसही शुक्रवारचा आहे. म्हणजे वर्षाच्या शेवटी चांगली विश्रांती मिळेल. २१ मार्चला रमजान ईद शनिवारी आहे, तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्ष शनिवारीच. इतर महत्वाच्या सुट्ट्या म्हणजे १९ फेब्रुवारीला शिवजयंती गुरूवारी, गुढीपाडवा आणि रामनवमी मार्चमध्ये गुरूवारी आहे. त्याशिवाय गुड फ्रायडेचा दिवस शुक्रवारी आहे.

Public Holiday
Vande Bharat Express : १६० चा वेग, विमानासारखा अलिशान प्रवास, पहिली वंदे भारत स्लीपर या मार्गावर धावणार, तारीख नोट करा

दिवाळीच्या काळात अमावस्या रविवारी, पण बलिप्रतिपदा आणि भाऊबीज मंगळवार-बुधवारी आहेत. या आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या सुट्ट्या अन् शनिवार-रविवार जोडून सुट्ट्या एकत्र करून फिरायला जायचा प्लॅन करू शकता. सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि बँकांना सुट्ट्या लागू आहेत. पुढच्या वर्षी मित्र अथवा कुटुंबासोबत किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत फिरण्याचा प्लॅन करायचा असेल तर आताच तारखा नोट करा अन् तिकिटे बुक करा.

Public Holiday
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार, २५ मिनिटांचा वेळ वाचणार, केबल स्टे ब्रिज नेमका कुठे उभारलाय?

२०२६ मध्ये असणाऱ्या सार्वजनिक सुट्यांची यादी -

२६ जानेवारी २०२६, सोमवार - प्रजासत्ताक दिन

१५ फेब्रुवारी २०२६, रविवार - महाशिवरात्री

१९ फेब्रुवारी २०२६, गुरूवार - छत्रपती शिवाजी महाराज जयंती

३ मार्च २०२६, मंगळवार - होळी

१९ मार्च २०२६, गुरूवार - गुढीपाडवा

२१ मार्च २०२६, शनिवार - रमजान ईद (ईद उल फितर)

२६ मार्च २०२६, गुरूवार - रामनवमी

३१ मार्च २०२६, मंगळवार - महावीर जन्म कल्याणक

३ मार्च २०२६, शुक्रवार - गुड फ्रायडे

१४ एप्रिल २०२६, मंगळवार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१ मे २०२६, शुक्रवार - महाराष्ट्र दिन

१ मे २०२६, शुक्रवार - बुद्ध पौर्मिमा

२८ मे २०२६, गुरूवार - बकरी ईद (ईल उल झुआ)

२६ जून २०२६, शुक्रवार - मोहरम

१५ ऑगस्ट २०२६, शनिवार - स्वातंत्र्य दिन

१५ ऑगस्ट २०२६, शनिवार - पारशी नववर्ष दिन (शहेनळशाही)

२६ ऑगस्ट २०२६, बुधवार - ईद ए मिलाद

१४ सप्टेंबर २०२६, सोमवार - गणेश चतुर्थी

२ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार - महात्मा गांधी जयंती

२० ऑक्टोबर २०२६, मंगळवार - दसरा

८ नोव्हेंबर २०२६, रविवार - दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)

१० नोव्हेंबर २०२६, मंगळवार - दिवाळी (बलिप्रतिपदा)

११ नोव्हेंबर २०२६, बुधवार - भाऊबीज

२४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार - गुरूनानक जयंती

२५ डिसेंबर २०२६, शुक्रवार - ख्रिसमस

१ एप्रिल २०२६ बुधवार - बँकांना आपले वर्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी - ही सुट्टी फक्त बँकांसाठी मर्यादित आहे. सरकारी कार्यालयासाठी लागू नाही.

Public Holiday
Special Trains : ख्रिसमस, नव्या वर्षासाठी रेल्वेचा मास्टरप्लान, मुंबई-पुण्यातून धावणार ७६ स्पेशल ट्रेन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com