Special Trains : ख्रिसमस, नव्या वर्षासाठी रेल्वेचा मास्टरप्लान, मुंबई-पुण्यातून धावणार ७६ स्पेशल ट्रेन्स

central railway schedule for 76 festive special trains : ख्रिसमस आणि नववर्षाच्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ७६ ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
Special Trains :
Indian Railway Saam Tv
Published On

Indian Railways Announces 76 Christmas–New Year Special Trains from Mumbai and Pune : ख्रिसमस आणि नव्या वर्षात अनेकजण फिरण्याचा अथवा गावी जाण्याचा बेत आखतात. या काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या अतिरिक्त गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून खास ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्याहून ७६ विशेष रेल्वे धावणार आहेत. रेल्वेकडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहेत. त्याशिवाय कोणत्या ट्रेन धावणार आहेत? हेही अधिकृत सांगण्यात आले आहे. या विशेष गाड्या मुंबई–करमळी / नागपूर / मंगळुरू / तिरुवनंतपुरम तसेच पुणे–नागपूर / अमरावती /सांगानेर दरम्यान चालवण्यात येणार आहेत.

पुणे – नागपूर – पुणे

नागपूर आणि पुणे यादरम्यान नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. या एक्सप्रेसला प्रतिसाद चांगला मिळतोय. तरीही प्रवासांची संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळेच सुट्टीच्या काळात या मार्गावर स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 01401 ही साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात धावणार आहे. पुणे येथून प्रत्येक शुक्रवारी २०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १४.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला दर शनिवारी नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.

दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धमनगाव आणि वर्धा या स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे.

Special Trains :
जात प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट! आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी ही विशेष ट्रेन १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या काळात दररोज सीएसएमटी स्थानकातून ००.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन दररोज करमळी येथून १४.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी ०३. ४५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थीवी या स्थानकात ही ट्रेन थांबणार आहे.

Special Trains :
Expressway Video : एक्सप्रेसवे वरील टोल नाक्यावर कपलचा रोमान्स, किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल अन्...

मुंबई – नागपूर – मुंबई

मुंबई-नागपूर-मुंबई यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ख्रिसमस अन् नव्या वर्षासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 01005 ही साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या दरम्यान धावणार आहे. सीएसएमटी स्थनाकातून प्रत्येक शनिवारी ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासाला प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १८.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२५ वाजता पोहोचेल.

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकावर ही ट्रेन थांबेल.

Special Trains :
Vande Bharat Express : १६० चा वेग, विमानासारखा अलिशान प्रवास, पहिली वंदे भारत स्लीपर या मार्गावर धावणार, तारीख नोट करा

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक टर्मिनस

01171 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर या मार्गावर १८ डिसेंबर ते ८ जानेवारी या काळात ही ट्रेन आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी धावेल. एलटीटी स्थानकातून ही ट्रेन प्रत्येक गुरूवारी १६.०० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला ही ट्रेन शनिवारी दुपारी १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल.

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी, करमळी, मडगांव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकल, मूकांबिका रोड बैदूर, कोंडापूर, उडुपी, सुरतकल, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, कोषीकोड, तिरूर, षोरनूर, त्रिशूर, आलुवा, एर्नाकुलम टाउन,कोट्टायम, चंगानस्सरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायमीकुलम, करुनागप्पल्ली, सस्तमकोट्टा, कोल्लम आणि वर्कला शिवगिरी स्थानकावर थांबेल.

Special Trains :
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार, २५ मिनिटांचा वेळ वाचणार, केबल स्टे ब्रिज नेमका कुठे उभारलाय?

पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट

१९ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान पुणे आणि सांगानेर यादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन धावणार आहे. 01405 ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी दर शुक्रवारी पुणे स्थानकातून ०९.४५ वाजता सुटेल आणि सांगानेर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला 01406 ही साप्ताहिक सुपरफास्ट दर शनिवारी सांगानेर स्थानकातून ११.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.

लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा, रतलाम, भानवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा आणि सवाई माधोपुर या स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे.

Special Trains :
जात प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट! आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र

लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस

१६ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन यादरम्यान साप्ताहिक ट्रेन धावेल. प्रत्येक मंगळवारी 01185 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसमधून १६.०० वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला 01186 ही ट्रेन बुधवारी मंगळुरू जंक्शन येथून १३.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी, करमळी, मडगांव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकल, मुकांबिका रोड बैदूर, कुंडापूर, उडुपी आणि सुरतकल या स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे.

Special Trains :
Nashik : नाशिकसाठी केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास आणखी वेगवान होणार, लोकलचाही मार्ग मोकळा

पुणे – अमरावती – पुणे साप्ताहिक विशेष गाड्या

पुणे–अमरावती साप्ताहिक विशेष २० डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात धावेल. 01403 ही साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी पुणे स्थानकातून १९.५५ वाजता सुटेल आणि पुढील दिवशी ०९.२५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. 01404 ही साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे पुढील दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल.

दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकात ही ट्रेन थांबेल.

Special Trains :
पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com