Nashik : नाशिकसाठी केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास आणखी वेगवान होणार, लोकलचाही मार्ग मोकळा

Mumbai–Nashik Rail Upgrade: मुंबई–नाशिक प्रवास वेगवान करण्यासाठी कसारा ते मनमाड दरम्यान १३१ किमी समांतर रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. पाच तालुक्यांतील ४४ गावांमध्ये जमीन संपादन सुरू होणार आहे.
Mumbai–Nashik Rail Upgrade
Mumbai–Nashik Rail UpgradeSaam TV Marathi
Published On
Summary
  • कसारा–मनमाड समांतर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालाय.

  • या प्रकल्पासाठी ४,५०० कोटींचा खर्च आहे.

  • ५ तालुक्यांतील ४४ गावांत भूसंपादन होणार आहे.

  • मुंबई–नाशिक प्रवास अधिक वेगवान होणार.

  • भविष्यात मुंबई–नाशिक लोकल सेवेला मार्ग मोकळा होण्याची शक्यता.

131 km Kasara–Manmad parallel railway line details : नाशिक शहराचा वेगाने विकास होतोय, दररोज लाखो लोक मुंबई-नाशिक आणि पुणे नाशिक असा प्रवास करतात. त्यामुळे रस्ते अन् रेल्वे मार्गावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे राज्य सरकार अन् केंद्र सरकारकडून नाशिकच्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिलेय. त्याचाच एक भाग म्हणून पुणे आणि नाशिक आणि मुंबई ते नाशिक या दोन शहरामध्ये रेल्वे मार्ग सुरू होणार आहेत. मुंबई आणि नाशिक या मार्गावर नवा रेल्वे मार्ग तयार झाल्यास लोकलचा मार्ग मोकळा होणार आहे. कसारा ते मनमाड यादरम्यान १३१ किमीच्या समांतर रेल्वे मार्गाला केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी अंदाजे ४,५०० कोटी रुपये खर्च होणार आहे. रेल्वेकडून लवकरच पाच तालुक्यांतील ४४ गावांमध्ये जमीन संपादनाला सुरूवात होणार आहे.

कसारा ते मनमाड यादरम्यान १३१ किमीचा अतिरिक्त समांतर रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे, त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण ते मनमाड या मार्गावर अतिरिक्त ताण अन् भारासह रेल्वे धावत आहेत. हाच ताण कमी करण्यासाठी आणि नाशिक-मुंबई या दोन शहरातील प्रवास जलद अन् सुकर करण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत.

Mumbai–Nashik Rail Upgrade
जात प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट! आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र

कल्याण-मनमाड या मार्गावर असणारा कसारा घाट हा सर्वाधिक अवघड मार्गांपैकी एक आहे. या भागात रेल्वेचा वेग अतिशय कमी होते. या मार्गावर सध्या देखभालीचे काम सुरू आहे त्यामुळे गाड्याचे नियोजन करणं कठीण जाते. त्यामुळे समांतर मार्ग उभारणं गरजेचं आहे. कसारा ते मनमाडदरम्यान १३१ किलोमीटरच्या नवीन मार्गाला मंजुरी मिळाली. याचा खर्च ४,५०० कोटींचा खर्च होईल असा अंदाज आहे. हा नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यास नाशिक अन् मुंबई या दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. त्याशिवाय दोन शहरांमध्ये लोकल सेवा सुरू होण्यासही मदत होईल.

Mumbai–Nashik Rail Upgrade
Vande Bharat Express : १६० चा वेग, विमानासारखा अलिशान प्रवास, पहिली वंदे भारत स्लीपर या मार्गावर धावणार, तारीख नोट करा

५ तालुक्यात ४४ गावात भूसंपादन -

या नव्या रेल्वे मार्गासाठी पाच तालुक्यांतील ४४ गावांमध्ये जमीन संपादन कऱण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून पावले उचलण्यात आली आहे. तातडीने भूसंपादन करायची असल्याने नियमितपेक्षा तिप्पट मोजणी शुल्क भरावे लागेल, अशी माहिती मिळाली आहे.

या गावात भूसंपादन होणार -

इगतपुरी - माणिकखांब, नांदगाव बु., बोरटेंभे, नांदूरवैद्य

नाशिक - वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवित, भगूर ग्रामीण, भगूर (एमसीआय), संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली, पंचक, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, सिद्ध पिंप्री

निफाड - चितेगाव, नारायणगाव, चांदोरी, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, पिंपळस, पिंपरी, निफाड, गीताकुंज, शिवडी, उगाव, थेटले, कोटमगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव (नि.)

चांदवड- वाकी खु., वाहेगावसाळ, काळखोडे, तळेगाव रोही, रायपूर, वडगाव पंगू, रापली नांदगाव - मनमाड

Mumbai–Nashik Rail Upgrade
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार, २५ मिनिटांचा वेळ वाचणार, केबल स्टे ब्रिज नेमका कुठे उभारलाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com