देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पटना–दिल्ली मार्गावर धावणार आहे.
या ट्रेनचा वेग ताशी १६० किमी असेल.
ट्रेनमध्ये विमानासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
१६ कोचेसमध्ये ८२७ प्रवासी क्षमता स्लीपर ट्रेनची असेल.
जानेवारी २०२६ पूर्वी सेवा सुरू होण्याची शक्यता.
Vande Bharat sleeper train Latest Update News : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पटना ते दिल्ली या मार्गावर धावण्यास सज्ज झाली आहे. या महिनाअखेर ही एक्सप्रेस रूळावरून धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. १६० किमीचा वेग असणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये विमानासारख्या सोयीसुविधा असतील. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशी वंदे भारत स्लीपर ट्रेनची वाट पाहत होते. अखेर या ट्रेनला रूळावर येण्याचा मूहुर्त सापडलाय.
या वंदे भारत स्लीपर ट्रेनला तेजससारखा १६० किमीचा वेग असेल असे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय राजधानीचा आराम आणि वंदे भारतचे प्रगत तंत्रज्ञान असे असेल. ताशी १६० किमी वेगानेही ही ट्रेन धावेल अन् त्यावेळी कपमधील चहाही सांडणार नाही, असा दावा रेल्वेकडून कऱण्यात आला आहे. चाचणीवेळी असाच व्हिडिओ रेल्वेकडून शेअर कऱण्यात आला होता. दिल्ली अन् पटना या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता वंदे भारत स्लीपरने प्रवास करता येणार आहे. हा प्रवास फक्त ८ तासात पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
बेंगळुरूमधील बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या रॅकचे काम १२ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पटना आणि दिल्ली या मार्गावर चाचणी होईल. जानेवारी २०२६ च्या आधी वंदे भारत स्लीपर ट्रेन रूळावर धावणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आठवड्यातून सहा दिवस धावणारी ही ट्रेन संध्याकाळी पटनाहून निघेल आणि सकाळी दिल्लीत पोहोचेल. संध्याकाळी दिल्लीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पटना येथे पोहोचेल. हा प्रवास फक्त ८ तासात पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ कोच असतील. त्यामध्ये ८२७ जणांना प्रवास करता येणार आहे. या स्लीपर ट्रेनमध्ये एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखी आरामदायी सुविधा असेल. ११ एसी ३ कोच, ४ वातानुकूलित २ कोच, १ वातानुकूलित १ कोच अशी या ट्रेनची रचना असेल. स्लीपर ट्रेन सर्व वर्गांना परडवणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रस इतकेच या स्लीपर ट्रेनच्या तिकिटाची किंमत असेल असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास कोचेस वाढवले जातील, असेही त्यांनी सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.