

स्मार्टफोनमध्ये पासवर्डशिवाय वायफाय कनेक्ट करता येते.
अँड्रॉइडमध्ये नेटवर्क "शेअर" करून QR कोडद्वारे कनेक्ट होता येते.
आयफोनमध्ये Bluetooth चालू ठेवून एक टॅपमध्ये पासवर्डशिवाय वायफाय शेअर करता येते.
जुन्या फोनसाठी मोफत अॅप्सद्वारे मॅन्युअल QR कोड तयार करून वायफाय शेअर करता येते.
How to Connect WiFi Without Password on smartphone : स्मार्टफोनवर वायफाय कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड टाकावाच लागतो, असे तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. पासवर्ड नसतानाही स्मार्टफोन वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करता येऊ शकते. इतकेच नाही तर इंटरनेट अॅक्सेसही करता येते. पासवर्डशिवाय स्मार्टफोनवर वायफाय कसं कनेक्ट करता येऊ शकते? याबाबतच माहिती आपण जाणून घेऊयात.. (How to connect WiFi without password using QR code)
कधीकधी पासवर्ड खूप लांबसडक अथवा किचकट असतात. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे नसते. त्याशिवाय स्मार्टफोनवर वाय-फाय पासवर्ड टाइप करतानाही अनेकदा चुका होतात. तर काहीजणांना आपल्या वायफायचा पासवर्ड इतरांसोबत शेअर करायचा नसतो. अशा परिस्थितीत पासवर्डशिवाय कनेक्ट करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. पासवर्ड न टाकता तुम्ही तुमचा फोन वाय-फायशी कसा जोडू शकता ते पाहूयात..How to Connect WiFi Without Password
पासवर्डशिवाय स्मार्टफोनमध्ये वाय-फाय शेअर करण्यासाठी बिल्ट-इन पर्याय उपलब्ध आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे करणं खूपच सोपं आहे. कनेक्टेड नेटवर्कचे नाव टॅप करता तेव्हा तुम्हाला "शेअर" पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्याने तुमच्या फोनवर एक QR कोड दिसेल. तुमच्या वाय-फाय किंवा मोबाइल डेटाशी कनेक्ट होण्यासाठी कोणीही हा कोड स्कॅन करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्याचा QR कोड स्कॅन करून वाय-फाय वापरू शकता.
आयफोन असेल तरीही टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण फक्त एका टॅपने वाय-फाय द्वारे कनेक्ट होऊ शकता . आयफोनमधील ब्लूटूथ चालू करावे लागेल आणि तुमची वाय-फाय सेटिंग्ज उघडावी लागतील. तुमचे नेटवर्क जेव्हा तुमचा मित्र निवडतो तेव्हा तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. तुम्हाला अॅक्सेस शेअर करायचा आहे का? असे विचारले जाते. 'शेअर करा' वर टॅप करा आणि तुमचा फोन पासवर्ड न उघडता कनेक्ट होईल.
जुन्या स्मार्टफोनवर तुम्ही मॅन्युअली वाय-फाय QR कोड तयार करू शकता. नेटवर्कचे नाव आणि पासवर्ड टाकून QR कोड तयार करण्याची परवानगी देणारे अनेक मोफत अॅप्स आणि वेबसाइट्स आहेत. तुम्ही हा कोड सेव्ह करू शकता. कुणाला वायफाय द्यायचा असेल तर क्यूआरकोड देऊ शकता. वारंवार पासवर्ड शेअर करण्याची गरज नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.