Pune Navle Bridge Accident News Update : पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांचं सत्र सुरूच आहे. नवले पुलाजवळच्या ब्लॅक स्पॉटवर आज एकदा पुन्हा अपघात झाला आहे. नवले पूलाजवळच्या ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले. विशेष म्हणजे नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. पण अपघाताचं सत्र काही थांबत नाही. Pune Navle Bridge school bus and car collision latest update
स्कूल बस आणि कारच्या धडकेनंतर नवले ब्रिजवर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तात्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवले पूलावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, पण अपघाताचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीत. स्कूल बस आणि कारच्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.