Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० येणार, २९ महापालिका निवडणुकीआधी महायुती डाव टाकणार?

Is ₹3000 being transferred before municipal elections in Maharashtra? लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे ३००० हजार रूपये एकत्र येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून लाडकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Beneficiary women may receive a combined ₹3000 installment under Ladki Bahin Yojana ahead of civic elections.Saam Tv
Published On
Summary
  • लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर हप्ता रखडला.

  • दोन महिन्यांचे ₹३००० एकत्र येण्याची शक्यता.

  • १५ डिसेंबरनंतर २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात.

  • केवायसी अनिवार्य असून पूर्ण न केल्यास हप्ता मिळणार नाही.

When will Ladki Bahin Yojana November and December installments be credited? : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये अद्याप जमा झालेले नाहीत. राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे ३००० रूपये लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये ७ डिसेंबर पर्यंत खात्यावर येतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे पुढील काही दिवसात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते एकाच वेळी येण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात १५ डिसेंबरनंतर २९ महापालिका निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. त्याआधी सरकारकडून लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ३००० रूपये जमा केले जाऊ शकतात. ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. ३० डिसेंबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी पूर्ण करायची आहे.

Ladki Bahin Yojana
Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १७ वा हप्ता (november installment of ladki bahin yojana) येणार होता. पण आठवडा उलटला पण अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील निवडणुका पाहता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकाचवेळी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, आठवडाभरात १७ आणि १८ व्या हप्त्याबाबत राज्य सरकारकडून घोषणा कऱण्यात येईल. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाचवेळी ३००० रूपये जमा होतील. याचा फायदा महापालिका निवडणुकीत होण्यासाठी सरकारकडून ही खेळी केली जात आहे.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

KYC महत्त्वाची अन् अनिवार्य - आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या सर्व महिलांना KYC करणं अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्वा महिलांना KYC करावी लागणार आहे. KYC अनिवार्य असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. KYC केली तरच खात्यावर प्रत्येक महिन्याला १५०० रूपये येतील, अन्यथा लाभ बंद होईल, असे स्पष्ट कऱण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

कधी येणार खात्यावर पैसे ?

केवायसी प्रक्रियेमुळे महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करता आले नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन महिन्यांचा निधी पाठवण्याची योजना आहे, असे महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याने NBT ला सांगितले. दरम्यान, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. या काळात सरकारला आचारसंहितेचे पालन करायचे आहे.

Ladki Bahin Yojana
Pune : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com