Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Maharashtra Weather Update News : राज्यात पुन्हा थंडी वाढली असून किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे येथे ५.४°c, नागपूर-गोंदिया-यवतमाळमध्येही पारा घसरला आहे.
Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
Maharashtra WinterSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात पुन्हा गारठा वाढला असून विदर्भात थंडीची लाट जाणवत आहे.

  • धुळे येथे ५.४°c तर गोंदिया, नागपूर, अमरावती येथे तापमानात मोठी घट.

  • जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस ८–११°c तापमान राहण्याची शक्यता.

  • यवतमाळचा पारा १०°c नोंदवला जाऊन महाबळेश्वरपेक्षा थंडगार वातावरण.

Maharashtra cold wave latest weather update : किमान तापमानात पन्हा एकदा घट होत असल्याने राज्यात थंडी वाढत आहे. मागील काही दिवस राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरला आहे. त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात होत आहे. राज्यात सर्वाधिक थंडी विदर्भात आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. वर्धा, भंडारा आणि गोंदिया येथे पुढील काही दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यात कडाक्याची थंडी पडली असून आजपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही थंडीची लाट कायम असून नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात पारा १० अंशाच्या खाली गेलाय..हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहील ..त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र पुन्हा एकद गारठण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरली आहे. राज्यात धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया मध्ये ८.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवासंपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात पुढील काही दिवस आणखी घट घोण्याची शक्यात आहे.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

नागपूरमध्ये ८.५ तर अमरावतीमध्ये ९.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यभरात थंडी वाढण्याची शक्यता आहे. दिवसा कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या तापमानात घट होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

धुळ्यात थंडीचा जोर वाढला

धुळ्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आज धुळ्यामध्ये 5.4° c तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान मानलं जात आहे. तापमानामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे धुळेकरांनाचांगलीच हुडहुडी देखील भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट जाणवत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने तापमानामध्ये घट होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता धुळ्याकरांवर होताना दिसून येत आहे.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडले, विरोधी पक्षनेताच नाही

गारठा आजपासून वाढणार, पारा चार दिवस ८ ते ११ अंश राहणार

जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत किमान तापमान ८ ते ११ अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते. वातावरण अंधुक किंवा ढगाळ, भौगोलिक भाषेत या स्थितीला 'हेझ' म्हणतात. धुके व कोरड्या वाऱ्यांमुळे जळगावचा पारा आजपासून पुढील चार दिवस ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अर्थात, गारठा वाढेल. रविवारी पारा १२.२ अंशांवर होता. सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली येऊ शकते, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
Gold Price Today : मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

यवतमाळ जिल्हा महाबळेश्वर पेक्षाही थंडगार

यवतमाळ जिल्ह्यातील तापमानाचा पारा 10°c नोंदविण्यात आलाय. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वराचा पारा 13.2 अंश असून त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याचा पारा घसरल्याने जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. यंदा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीच्या दोन ते तीन लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Winter Alert : महाराष्ट्र गारठला!
PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com