Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

Nagpur on High Alert : उपराजधानी नागपूरमध्ये घातपाताचा इशारा देण्यात आला. जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. महत्त्वाच्या स्थळांवर कडेकोट सुरक्षा, १० हजारांवर पोलीस तैनात करण्यात आलेत.

Nagpur Threat News : उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा देण्यात आलाय..ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद भारतात घातपात घडवू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय..त्यामुळे पोलिसांनी महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, रेशीमबागेतील स्मृतिभवन यासह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवलीय..नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या, होमगार्डसह 10 हजारांवर पोलीस तैनात करण्यात आलेत.. याशिवाय, एआयच्या मदतीनेही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विधानभवन, रामगिरी, दीक्षाभूमी, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानांभोवतीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.. हॉटेल आणि लॉजचीही कसून तपासणी करण्यात येतेय. (Nagpur terror threat intelligence report )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com